एक्स्प्लोर

ठाकरेंना 'दे धक्का', उपनेत्या राजूल पटेलांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश; आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

गेली अडीच वर्ष झालं आम्ही गद्दरांशी लढत होतो, आता ईव्हीएम सोबत लढत असल्याचे वक्तव्य युवासेनाप्रमुख आणि ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केलं.

Aaditya Thackeray : गेली अडीच वर्ष झालं आम्ही गद्दरांशी लढत होतो, आता ईव्हीएम सोबत लढत असल्याचे वक्तव्य युवासेनाप्रमुख आणि ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केलं. आता काहीजण स्वार्थासाठी गद्दारी करत आहेत, तिकडे जात असल्याचे ठाकरे म्हणाले. आम्ही महाराष्ट्र मुंबईसाठी लढत आहोत, कोणीही गेले तरी आम्ही लढत राहणार असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. 

विधानसभा निवडणुकीनंतर आता सर्वांनाच वेध लागले ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, महापालिका निवडणुकांचे. विशेष म्हणजे शिवसेना ठाकरे गटाकडून महापालिका निवडणुकांची तयारी देखील सुरू झाली आहे. मुंबई महापालिकेत स्वतंत्रपणे उमेदवार देण्याची घोषणाच खासदार संजय राऊत यांनी केली आहे. त्यामुळे, महापालिका निवडणुकांसाठीची मोर्चबांधणी सुरू झाली असून आजच पुण्यात बैठक घेण्यात आली आहे. दुसरीकडे शिवसेना शिंदे गटानेही कंबर कसली असून ऑपरेशन टायगर सुरू केल्याचं मंत्री उदय सामंत यांनी काही दिवसांपूर्वीच सांगितलं होतं. त्या अनुषंगाने ठाकरे गटाला धक्का देत काही नेत्यांचा हाती शिवधनुष्य देऊन उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) धक्का दिला जात आहे. त्यातच, आता आगामी महापालिका निवडणुकांपूर्वीच ठाकरेंना मुंबईत मोठा धक्का बसला आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या, विधानसभा महिला संघटक आणि माजी नगरसेवक राजुल पटेल शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. राजुल पटेल यांनी वर्सोवा विधानसभा मतदारसंघातून यावेळी उमेदवारी मागितली होती. मात्र, त्यांच्याऐवजी हारून खान यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली होती.

कोण आहेत राजुल पटेल?

राजुल पटेल या शिवसेनेच्या माजी नगरसेविका म्हणून ठाकरेंच्या शिवसेनेत कार्यरत होत्या, त्याशिवाय त्यांनी 2019 साली विधानसभा निवडणूक सुद्धा लढवली होती. ठाकरेंच्या शिवसेना पक्षातील जुन्या महिला शिवसैनिक म्हणून राजुल पटेल यांची ओळख आहे. त्यामुळे, महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडल्यास ठाकरेंच्या शिवसेनेला हा मोठा धक्का मानला जात आहे. कारण, वर्सोवा हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जात असून या मतदारसंघात राजूल पटेल यांचं राजकीय वजन आहे. मात्र, विधानसभा निवडणुकांपासून त्या नाराज असल्याने महापालिका निवडणुकांचा मुहूर्त साधण्याचा प्रयत्न त्यांनी केल्याचं बोललं जात आहे.

एसटी भाडेवाढीच्या संदर्भात देखील आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. निवडणुकीच्या आधी हे मोफत देऊ ते मोफत देऊ असे चालेले होते. आता भाडेवाढ करत आहेत. 
पुढचे 6 महिन्याचे पैसे आता लाडक्या बहिणींना द्या अशी आमची मागणी असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. 

महत्त्वाच्या बातम्या

सेंट्रल बँकेच्या खात्यातून 13.96 कोटी RTGS द्वारे लंपास, 107 जणांच्या अकांटमध्ये जमा; सायबरकडून आरोपीला बेड्या
सेंट्रल बँकेच्या खात्यातून 13.96 कोटी RTGS द्वारे लंपास, 107 जणांच्या अकांटमध्ये जमा; सायबर पोलिसांकडून आरोपीला बेड्या
पदवीधरच्या निकालानंतर सतीश चव्हाण म्हणाले, माझा घात झाला; अब्दुल सत्तारांनी पुन्हा डिवचलं, शायरीतून टोला
पदवीधरच्या निकालानंतर सतीश चव्हाण म्हणाले, माझा घात झाला; अब्दुल सत्तारांनी पुन्हा डिवचलं, शायरीतून टोला
सराफ व्यावसायिकाचं भरदिवसा इनोव्हातून अपहरण, सर्वत्र खळबळ; पोलीस तपासात धक्कादायक ट्विस्ट, तेलंगणा कनेक्शन
सराफ व्यावसायिकाचं भरदिवसा इनोव्हातून अपहरण, सर्वत्र खळबळ; पोलीस तपासात धक्कादायक ट्विस्ट, तेलंगणा कनेक्शन
मुख्यमंत्री संवेदनशील! 5 हजारांची मदत ही अग्रिम आहे, अंतिम नाही, अधिकची मदत शेतकऱ्यांना होणारच, मंत्री जयकुमार गोरेंनी दिली महत्वाची माहिती  
मुख्यमंत्री संवेदनशील! 5 हजारांची मदत ही अग्रिम आहे, अंतिम नाही, अधिकची मदत शेतकऱ्यांना होणारच, मंत्री जयकुमार गोरेंनी दिली महत्वाची माहिती  

व्हिडीओ

Sanjay Raut : अमित शहांची केंद्रीय गृहमंत्रिपदावरून तातडीने हकालपट्टी करा; संजय राऊतांची थेट मागणी
Coffee With Kaushik Sandeep Tamgadge : चीनची घुसखोरी ते म्यानमारमधील तस्करी, भिडणारा अधिकारी
India Alliance Vs BJP : 'इंडिया' आघाडीचा महामोर्चा, भाजपच्या देशभरात पदयात्रा Special Report
Inflation Diwali : दिवाळीपूर्वीच महागाईचा दणका...CNG चे दर वाढले, जेट इंधनातही भाववाढ Special Report
Sanjay Raut Delhi PC : रावणलीला' संपवण्यासाठीच रामलीला मैदानावर आंदोलन! संजय राऊतांचा घणाघात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सेंट्रल बँकेच्या खात्यातून 13.96 कोटी RTGS द्वारे लंपास, 107 जणांच्या अंकांटमध्ये जमा; सायबरकडून आरोपीला बेड्या
सेंट्रल बँकेच्या खात्यातून 13.96 कोटी RTGS द्वारे लंपास, 107 जणांच्या अंकांटमध्ये जमा; सायबर पोलिसांकडून आरोपीला बेड्या
Amit Shah Vs Rahul Gandhi : 'किमान नकली संसदेत तरी पंतप्रधान व्हा',  अमित शाहांचा राहुल गांधींना टोला; भाजपच्या 'लोकतंत्र बचावो' पदयात्रेत काँग्रेसला झोडपलं
'किमान नकली संसदेत तरी पंतप्रधान व्हा',  अमित शाहांचा राहुल गांधींना टोला; भाजपच्या 'लोकतंत्र बचावो' पदयात्रेत काँग्रेसला झोडपलं
पदवीधरच्या निकालानंतर सतीश चव्हाण म्हणाले, माझा घात झाला; अब्दुल सत्तारांनी पुन्हा डिवचलं, शायरीतून टोला
पदवीधरच्या निकालानंतर सतीश चव्हाण म्हणाले, माझा घात झाला; अब्दुल सत्तारांनी पुन्हा डिवचलं, शायरीतून टोला
सराफ व्यावसायिकाचं भरदिवसा इनोव्हातून अपहरण, सर्वत्र खळबळ; पोलीस तपासात धक्कादायक ट्विस्ट, तेलंगणा कनेक्शन
सराफ व्यावसायिकाचं भरदिवसा इनोव्हातून अपहरण, सर्वत्र खळबळ; पोलीस तपासात धक्कादायक ट्विस्ट, तेलंगणा कनेक्शन
देशाला मोदीजी हवे आहेत, राहुल गांधींना अतिडावी व्यवस्था उभी करायचीय, मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल, म्हणाले संविधान वाचवण्यासाठी आम्ही रस्त्यावर 
देशाला मोदीजी हवे आहेत, राहुल गांधींना अतिडावी व्यवस्था उभी करायचीय, मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल, म्हणाले संविधान वाचवण्यासाठी आम्ही रस्त्यावर 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2026 | सोमवार
Imran Khan : OCI कार्डधारक असताना SIR आंदोलनात का गेला? तुमचा आणि भारतातील आंदोलनाचा काय संबंध? इम्रान खानला न्यायालयाने फटकारले
OCI कार्डधारक असताना SIR आंदोलनात का गेला? तुमचा आणि भारतातील आंदोलनाचा काय संबंध? इम्रान खानला न्यायालयाने फटकारले
जम्मू आणि काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्सच्या 25 आमदारांचा सीएम ओमर अब्दुल्लांना 14 दिवसांचा अल्टिमेटम; 'मागण्या मान्य न झाल्यास..'
जम्मू आणि काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्सच्या 25 आमदारांचा सीएम ओमर अब्दुल्लांना 14 दिवसांचा अल्टिमेटम; 'मागण्या मान्य न झाल्यास..'
Embed widget