एक्स्प्लोर

आधार नोंदणीशिवाय रेशनिंग दुकानातून केरोसिन वाटप नाही

सरकारच्या विविध योजना आणि सुविधांचा लाभ मिळवण्यासाठी आधारकार्ड सक्तीचं आहे. तसेच आता रेशनिंग दुकानातून आधार नोंदणीशिवाय केरोसिनही मिळणार नाही.

उस्मानाबाद : सरकारच्या विविध योजना आणि सुविधांचा लाभ मिळवण्यासाठी आधारकार्ड सक्तीचं आहे. तसेच आता रेशनिंग दुकानातून केरोसिन मिळण्यासाठीही आधार नोंदणी सक्तीची असणार आहे. आजपासून महाराष्ट्रातल्या 88 लाख शिधापत्रिका धारकांना पीओएसमधूनच केरोसीन मिळणार आहे. आधार नसल्यास शिधापत्रिका धारकांना ई-केवायसी बंधनकारक असणार आहे.

राज्य सरकारने पीओएस नावाची मशिन शिधावाटप दुकानदारांना दिली आहे. पीओएस मशिन शिधापत्रिका धारकांच्या आधारकार्डशी जोडलेली आहे. शिधापत्रिका धारकांना या मशिनद्वारेच धान्य मिळत आहे. राज्यात एकूण 88 लाख शिधापत्रिका धारकांना केरोसिन मिळतं. मात्र यातील अनेक जण केरोसिनचा गैरवापर करत होते किंवा घरात गॅस असूनही ते शिधावाटप दुकानातून केरोसिन घेत होते, असा संशय सरकारला होता.

केरोसिनचा गैरवापर कमी व्हावा यासाठी सरकारने 1 जून ते 31 जुलै दरम्यान प्रायोगिक पातळीवर पीओएसच्या माध्यमातून केरोसिन देण्याचा प्रयोग मुंबईत राबवला. यामध्ये केवळ मुंबईत जवळपास 30 टक्के केरोसिनची बचत झाल्याचे सरकारच्या लक्षात आले.

मुंबईतील प्रयोग यशस्वी झाल्यानंतर राज्यातील 59 हजार 553 केरोसिन परवानाधारक वितरक आहेत, त्यांना आधार नोंदणी नसलेल्या शिधापत्रिका धारकांना केरोसिन वाटप न करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. आधार नसल्यास ई-केवायसी बंधनकारक असल्याचे सरकारने स्पष्ट केलं आहे.

राज्य सरकारच्या नव्या निर्णयामुळे पेट्रोलमध्ये भेसळ करण्यासाठी जे केरोसिन वापरलं जात होतं, त्यावर आळा बसू शकतो. तसेच केरोसिनची सबसिडीसाठी सरकारचा जो अतिरिक्त पैसा खर्च होत होता त्याची बचत होऊ शकते.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Weather Update: पश्चिमेकडील वाऱ्यांचा वेग वाढला; पालघरसह 'या' भागात रेड अलर्ट ; पुढील 24 तासांत..; हवामान खात्याचे नेमकं काय सांगितलं?
पश्चिमेकडील वाऱ्यांचा वेग वाढला; पालघरसह 'या' भागात रेड अलर्ट ; पुढील 24 तासांत..; हवामान खात्याचे नेमकं काय सांगितलं?
Tukaram Munde FDA Action On BMC Canteen Mumbai: मुंबई महानगरपालिकेच्या कॅन्टीनवर धाड टाकत थेट सील करुन टाकले; तुकाराम मुंढेंच्या FDA ची कारवाई
मुंबई महानगरपालिकेच्या कॅन्टीनवर धाड टाकत थेट सील करुन टाकले; तुकाराम मुंढेंच्या FDA ची कारवाई
Anna Hazare Letter to PM Modi: 'एखाद्या मंत्र्याचा राजीनामा घेतल्याने सरकारची सत्ता जाणार नाही'; अण्णा हजारेंचे पीएम मोदींना खरमरीत पत्र, काय-काय म्हणाले?
'एखाद्या मंत्र्याचा राजीनामा घेतल्याने सरकारची सत्ता जाणार नाही'; अण्णा हजारेंचे पीएम मोदींना खरमरीत पत्र, काय-काय म्हणाले?
Maharashtra Live News Updates: जंतर मंतरवर काही काळ गदारोळ, पुन्हा तणावपूर्ण शांतता
Maharashtra Live News Updates: जंतर मंतरवर काही काळ गदारोळ, पुन्हा तणावपूर्ण शांतता

व्हिडीओ

Fadnavis Daughter X Post : सीजेपी आंदोलनावर मुख्यमंत्र्यांच्या कन्या दिविजा फडणवीसांची प्रतिक्रिया
Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi on PM Modi:
"तुम्हीच आपल्या देशातील तरुणांच्या भविष्याशी सर्वाधिक खेळलाय, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्या, विद्यार्थ्यांची माफी मागा" राहुल गांधींचा मोदींवर कडाडून हल्लाबोल
Tukaram Munde FDA Action On BMC Canteen Mumbai: मुंबई महानगरपालिकेच्या कॅन्टीनवर धाड टाकत थेट सील करुन टाकले; तुकाराम मुंढेंच्या FDA ची कारवाई
मुंबई महानगरपालिकेच्या कॅन्टीनवर धाड टाकत थेट सील करुन टाकले; तुकाराम मुंढेंच्या FDA ची कारवाई
Sonam Wangchuk Health Update: उपोषणावरती सोनम वांगचुक अद्यापही ठाम; डॉक्टरांनी सांगितली तब्येतीची अपडेट, म्हणाले 'दुष्परिणाम त्यांच्या ऑर्गन्सवर होऊ शकतो, सरकारने...'
उपोषणावरती सोनम वांगचुक अद्यापही ठाम; डॉक्टरांनी सांगितली तब्येतीची अपडेट, म्हणाले 'दुष्परिणाम त्यांच्या ऑर्गन्सवर होऊ शकतो, सरकारने...'
Sameer Choughule Angry On Student Protest: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम समीर चौघुलेंची विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर खरमरीत पोस्ट, नको-नको ते बरळणाऱ्यांनाही खडसावलं, म्हणाले...
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम समीर चौघुलेंची विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर खरमरीत पोस्ट, नको-नको ते बरळणाऱ्यांनाही खडसावलं, म्हणाले...
Nashik Rain: नाशिकमध्ये जोर'धार', दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी; गंगापूर धरणातून विसर्ग वाढवला, त्र्यंबकेश्वरला पत्रे उडून तीन भाविक जखमी
नाशिकमध्ये जोर'धार', दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी; गंगापूर धरणातून विसर्ग वाढवला, त्र्यंबकेश्वरला पत्रे उडून तीन भाविक जखमी
Pune Leopard Attack : गोठ्यात झोपलेली; पहाटे तीनच्या सुमाराच्या तो आला अन्...; चिमुरडी किंचाळल्यानंतर आई-वडिलांनी पाहिलं, तोपर्यंत तिला बिबट्यानं जबड्यात धरून उसात धूम ठोकली
गोठ्यात झोपलेली; पहाटे तीनच्या सुमाराच्या तो आला अन्...; चिमुरडी किंचाळल्यानंतर आई-वडिलांनी पाहिलं, तोपर्यंत तिला बिबट्यानं जबड्यात धरून उसात धूम ठोकली
Narendra Modi on CJP Protest Delhi Jantar Mantar: काँकरोच जनता पार्टीच्या आंदोलनावर नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया, NEET पेपरफुटी प्रकरणावर महत्वाचे आदेश
काँकरोच जनता पार्टीच्या आंदोलनावर नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया, NEET पेपरफुटी प्रकरणावर महत्वाचे आदेश
Divija Fadnavis on CJP Protest Delhi Jantar Mantar: काँकरोच जनता पार्टीच्या जंतर मंतरवरील आंदोलनावर दिविजा फडणवीस यांनी रोखठोक मत मांडलं; काय काय म्हणाल्या?
काँकरोच जनता पार्टीच्या जंतर मंतरवरील आंदोलनावर दिविजा फडणवीस यांनी रोखठोक मत मांडलं; काय काय म्हणाल्या?
Embed widget