मुंबई : एसटी संपादरम्यान (ST Strike)  सेवा समाप्तीची कारवाई केलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेणार नसल्याची  माहिती  महामंडळातील सूत्रांनी दिली आहे. तसेच एसटी महामंडळातील जे कर्मचारी कामावर हजर होत नाहीत त्यांच्यावर मेस्माअंतर्गत (Mesma Act) कारवाई होण्याची शक्यता आहे. पण हा मेस्मा म्हणजे नेमकं काय? मेस्माचा वापर कधी करण्यात येतो? जाणून घेऊयात मेस्मा कायद्याबाबत सविस्तर 


Mesma कधी लावण्यात येतो?


नागरिकांना काही अत्यावश्यक सेवा मिळायलाच हव्या. त्यासाठी या कायद्याचा वापर केला जातो. अनेकदा साठेबाजी किंवा अत्यावश्यक सेवा विस्कळीत करणाऱ्या मोर्चा आणि आंदोलनाला रोखण्यासाठी Mesma लावण्यात येतो.


Mesma कधी अंमलात आला?


केंद्र सरकारने हा कायदा 1968 साली अंमलात आणला होता. त्यानंतर राज्यांनाही हा कायदा अंमलात आणण्याचे अधिकार मिळाले होते.  अत्यावश्यक सेवा पुरणाऱ्या लोकांनी संप केल्यास तो संप रोखण्यासाठी हा कायदा लागू करण्यात येतो.


Mesma किती दिवसांपर्यंत लागू करण्यात येतो? 


 हा कायदा लागू झाल्यानंतर 6 आठवड्यापर्यंत सुरू राहू शकतो. जास्तीत जास्त हा कायदा 6 महिन्यांपर्यंत अंमलात आणता येतो.  हा कायदा लागू केल्यानंतर देखील कर्मचारी संप सुरू ठेवत असतील तसेच अत्यावश्यक सेवा बाधित करीत असतील तर, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचा सरकारला अधिकार असतो.


Mesma चे उल्लंघन झाल्यास काय कारवाई होते?


या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या कर्मचाऱ्याला विना वॉरंट अटक करण्याचाही अधिकार असतो. यामध्ये तुरूंगवास आणि दंडात्मक रक्कम भरण्याची तरतूद आहे. Mesma हा राज्य सरकारचा असा अधिकार आहे की, त्याद्वारे नागरिकांना मिळाणाऱ्या अत्यावश्यक सेवा विस्कळीत झाल्यास.  त्यासंबधीत कर्मचारी किंवा लोकांवर कारवाई करता येते.  त्या सेवा सुरू करण्यासाठी कर्मचाऱ्यांचा संप मोडीत काढता येतो.


ST Strike Loss : कर्मचाऱ्यांच्या संपामुळे एसटी महामंडळाला 439 कोटींचं नुकसान ABP Majha



संबंधित बातम्या :


ST Strike : संपकऱ्यांना धक्का; सेवा समाप्ती केलेल्या कर्मचाऱ्यांना एसटीची दारे बंद?


ST Strike : एसटी कर्मचाऱ्यांना तीन टक्के वार्षिक वेतनवाढ, 28 टक्के महागाई भत्ता आणि 10 तारखेला पगार; राज्य सरकारचे परिपत्रक जारी


पुन्हा संप करणार नाही; हमीपत्रावर घेतली जातेय एसटी कर्मचाऱ्यांची स्वाक्षरी?