वसई : प्रजासत्ताक दिनी ड्राय डे असतानाही दारु विकणाऱ्या बार आणि रेस्टॉरंटवर गुन्हे प्रतिबंधक शाखा आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने करवाई केली आहे. नालासोपारा पुर्वेकडील लेकसाइड या बार अँड रेस्टॉरेंटवर आज ही कारवाई करण्यात आली.


आज ड्राय डे असूनही या बारमध्ये अवैधरित्या दारू विक्री सुरु होती. नियमांचं उल्लंघन करत ड्राय डेच्या दिवशी दारु विक्री सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी बोगस ग्राहक पाठवून खरंच दारु विक्री होत आहे का याची खातरजमा केली. त्यानंतर पालघरचे पोलीस अधीक्षक यांच्या गुन्हे प्रतिबंधक शाखेच्या टीमने ही करवाई केली. त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने बारवर विभागीय कारवाई केली.


पालघरचे पोलीस अधीक्षक यांच्या गुन्हे प्रतिबंधक शाखेच्या टीमने नालासोपारा पुर्वेकडील डोंगरी येथील एका किराणा मालच्या दुकानात कारवाई केली. या कारवाईत मोठ्या प्रमाणात दारुचा साठा जप्त करण्यात आला आहे.


गुन्हे प्रतिबंधक शाखेच्या टीमने ही करवाई केल्याने राज्य उत्पादन विभागाच्या कार्यतत्परतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. यावर विचारलेल्या प्रश्नावरही अधिकाऱ्यांची भांभेरी उडालेली दिसून आली.