एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 26 जानेवारी 2019 | शनिवार

एबीपी माझाच्या वाचक, प्रेक्षकांना 70 व्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा

  1. टीम इंडियाच्या न्यूझीलंडवरच्या लागोपाठ दुसऱ्या विजयाने प्रजासत्ताक दिनाचा आनंद द्विगुणित, भारताकडून न्यूझीलंडचा 90 धावांनी धुव्वा, टीम इंडियाची मालिकेत 2-0 ने आघाडी https://goo.gl/FBjhrx


 

  1. राजपथावर देशाचं सामर्थ्य आणि संस्कृतीचं दर्शन, राष्ट्रपतींच्या हस्ते ध्वजारोहण, चित्ररथांनंतर हवाई कसरतींचं आकर्षण, तर महाराष्ट्रातही प्रजासत्ताक दिनाचा उत्साह, मुंबईच्या शिवाजी पार्कात पथसंचलन https://goo.gl/W19CnX


 

  1. भारतीय सैनिकांचा दहशतवाद्यांना दणका, प्रजासत्ताक दिनी घातपाताचा कट उधळला, श्रीनगरजवळील खोनमोहमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान https://goo.gl/pKLvEA


 

  1. व्यंगचित्रातून राज ठाकरेंचा मोदी-शाहांवर हल्ला, मोदींकडून देशाच्या प्रजासत्ताकाला फाशी दिल्याचं व्यंगचित्र, नेटिझन्स मात्र संतापले https://goo.gl/TA85F1


 

  1. प्रणव मुखर्जी, नानाजी देशमुख आणि भूपेन हजारिकांना भारतरत्न, सावरकरांना मात्र पुरस्कार जाहीर न झाल्यानं शिवसेनेची नाराजी https://goo.gl/wcwGs4


 

  1. 2025 पर्यंत महाराष्ट्र एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था असणारे देशातील पहिलं राज्य होणार, राज्यपाल सी विद्यासागर राव यांचा विश्वास https://goo.gl/wwZ4WS


 

  1. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंना पद्मविभूषण पुरस्कार, राज ठाकरेंकडून पुरंदरेंचं अभिनंदन, तर राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाडांची टीका https://goo.gl/kaEDBU


 

  1. प्रजासत्ताकदिनी लान्स नायक नजीर अहमद वानींना मरणोत्तर अशोक च्रक, सर्वोच्च वीरता पुरस्कार मिळवणारे पहिले काश्मिरी https://goo.gl/Z6HzaH


 

  1. मी शून्यावर बाद होणारी खेळाडू नाही, पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंना टोला, धनंजय मुंडे तोडपाणी करणारे नेते असल्याचाही आरोप https://goo.gl/bhgqJk


 

  1. शरद पवारांकडून साताऱ्यातील दोन्ही राजांच्या मनोमिलनाचा प्रयत्न, उदयनराजे आणि शिवेंद्रराजे एकाच गाडीतून प्रवास https://goo.gl/P8y7jX


 

महाराष्ट्रातील शूरवीर आणि वीरबालांचा सन्मान, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारांसह दिग्गजांची उपस्थिती, रात्री 9 वाजता माझा शौर्य पुरस्कार

यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv

व्हॉट्सअॅप - https://abpmajha.abplive.in/whatsapp-widget.html

एबीपी माझाच्या बातम्या आता मेसेंजरवर m.me/abpmajha

Android/iOS App ABPLIVE