यवतमाळ: यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यात एकतर्फी प्रेमातून तरुणीवर चाकू हल्ला करण्यात आला होता. आता या प्रकरणाला वेगळं वळण लागलं असून यातील आरोपीने विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. पोलिसांनी त्याला तात्काळ उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. सध्या आरोपीची प्रकृती स्थिर आहे.
आरोपीने विष विकत घेऊन त्याचा काही भाग प्राशन केल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी लगेच त्याला हॉस्पिटलमध्ये दाखलं केल्याने त्याची प्रकृती सध्या स्थिर आहे. सध्या त्याच्यावर उपचार सुरु आहेत.
तरुणी शेतात मजूरीचे काम करीत असताना आरोपी चितांमण पुसनाके याने तू दुसऱ्या व्यक्तीशी कसं काय लग्न करते? असे विचारत तिच्यावर चाकूने हल्ला केला होता. तरुणी पोटात चाकू असल्याने रक्ताच्या थारोळ्यात पडली. तिच्या सोबतच्या मैत्रिणींनी तिच्या नातेवाईकांना या घटनेची माहिती दिली. त्यांनतर मुलीच्या काकाने जखमी अवस्थेतेतील त्या मुलीला खाद्यांवर ऊचलून 500 मीटरपर्यंत आणले. त्यानंतर दुचाकीच्या साहाय्याने तिला घाटंजी रुग्णालयात दाखल केले.
त्यावेळी त्या तरुणीची प्रकृती चितांजनक असल्याने तिला यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यानंतर घाटंजी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आणि त्यावर गुन्हा दाखल केला. आता या प्रकरणातील आरोपीनेच विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे. या संबंधिचा अधिक तपास घाटंजी पोलीस करत आहेत.
राज्यात एकतर्फी प्रेमाच्या घटनेतून तरुणींवर करण्यात येणाऱ्या हल्ल्यांमध्ये वाढ झाल्याचं पहायला मिळतंय.