वाशिम : एरवी सासू सुनेच वैर हे सर्वश्रुत आहे. एकमेकींना कमी कस लेखता येईल याचा अनेकांनी पाहिलं आणि ऐकलं असेल. त्यावरून अनेक कुटुंबांत भांडणंही लागल्याचं अनेकांनीच पाहिलं असेल. मात्र, वाशिम जिल्ह्यात एका सासूचा सुनेला वाचवता वाचवता आपला जीव गमावला आहे. ही घटना आहे कोळी गावची.
कोळी गावात पोटाची खळगी भरण्यासाठी वाशिमच्या मानोरा तालुक्यातील कुपटा गावातील बुडके हे आदिवासी कुटुंब कोळी गावात वीट भट्टीवर कामासाठी तीन महिन्यांपूर्वी आलं होतं. कुटुंबातील एकूण पाच जण कामासाठी इथं आले होते यात सासू- सासरे, शीतल आणि तिचा पती आणि दीर यांचा समावेश होता.
सोमवारी दुपारच्या सुमारास वीट भट्टीचं काम आटोपून तलावावर अंघोळीसाठी आणि नंतर कपडे धुण्यासाठी गेलेल्या सुनेचा तलावात कपडे धुवत असताना पाय घसरला आणि ती पडली. हे लक्षात येताच सुनेला वाचवण्यासाठी म्हणून पुढे गेलेल्या सासुचाही बुडुन मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्याच्या कोळी इथं सोमवारी घडली आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
नित्यनियमाची कामं आटोपून शीतल बुटके ही तिची सासू जयंता बाई बुटके या दोघी अंघोळी नंतर कपडे धुण्यासाठी जवळच असलेल्या तलावावर गेल्या. तिथे कपडे धुवत असतानाच शीतलचा पाय घसरून ती पाण्यात घसरली. ती पाण्यात बुडत असल्याचं लक्षात येताच येताच सासूने सुनेचा हातला ओढत बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पण, तेव्हढ्यात जयंताबाईंचाही तोल गेला आणि त्यासुद्धा पाण्यात बुडू लागल्या. या दोघी बुडत असल्याचे त्यांच्या मुलाला दिसले त्याने त्या दोघींना वाचवण्याता प्रयत्न केला. पण, पोहणं येत नसल्यामुळे त्याने आरडा ओरड केला तेव्हा गावातील काही मुले तिथे आली आणि पाण्यातून जयंता बाईला बाहेर काढले पण, तो पर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.
Corona Cases Daily Update: आज कोरोनामुळं मृत्यू होणाऱ्यांचा आकडा वाढला; रुग्णसंख्येतही हजारोंनी वाढ
पाण्यात बुडालेल्या शीतलचा शोध लागला नव्हता. नंतर शहर पोलीसांना याची माहिती मिळताच ते घटना स्थळी दाखल झाले. पाण्यात बुडालेल्या शीतलचा मृतदेह काढण्यासाठी कोणीही सापड़त नसल्यामुळे गावातील लोकानी गळ आणून शोध घेत अनेक तासांच्या शोधानंतर काही तासांनी मृतदेह बाहेर काढण्यात आला. याप्रकरणी कारंजा शहर पोलिसात अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या घटनेनंतर सासू-सुनेचं असलेलं वेगळं नातं सामान्य नागरिकांच्या डोळ्यात आश्रू आणणारे होते