शिर्डी : पुत्र प्राप्तीबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या आरोपावरुन प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांच्याविरोधात खटला दाखल करण्यात आला होता. अशातच इंदुरीकर महाराजांना मोठा दिलासा मिळाला आहे. इंदुरीकर महाराजांविरोधातील खटला रद्द करण्यात आला आहे. दरम्यान, इंदुरीकर महाराजांच्या वतीने संगमनेर जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालयात अपील करण्यात आलं होतं. हे अपील न्यायालयानं मंजूर केलं आहे. संगमनेर दिवाणी न्यायालयाने दिलेल्या प्रोसेस इश्यू विरोधात इंदुरीकर महाराजांनी अपील केलं होतं. याप्रकरणी इंदुरीकर महाराजांच्या वतीनं निकाल देण्यात आला आहे.


प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराजांनी पुत्र प्राप्तीविषयी केलेल्या वक्तव्याप्रकरणी दिलासा मिळाला आहे. पीसीपीएनडीटी कायद्याच्या कलम 22 अंतर्गत संगमनेरच्या न्यायालात केस दाखल झाली होती. त्यावरील कोर्टाचे कामकाज पूर्ण झाले आहे. कोर्टाने इंदोकीकर महाराजांना 7 ऑगस्ट रोजी कोर्टासमोर उपस्थित होण्यास सांगीतले होते. न्यायालयाने आज इंदुरीकरांच रिव्हीजन अपील मंजुर करत खालच्या कोर्टाची प्रोसेस इश्यु ऑर्डर रद्द केली आहे.  


इंदुरीकर महाराजांच्या समर्थकांनी न्यायालयाच्या निकालानंतर पेढे वाटले आहेत. तर अंधश्रद्धा निर्मुलन समितीने यावर आणखी कडक भूमिका घेत, आपण या निकालाला आव्हान देण्यासाठी हायकोर्टात जाणार असल्याचं म्हटलं आहे. 


काय म्हणाले होते निवृत्ती महाराज इंदुरीकर?


स्त्रीसंग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि स्त्रीसंग जर अशीव वेळेला झाला तर ती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत मिळवणारी होतात. जर टाईमिंग हुकला की क्वालिटी खराब, असं सांगत, पुलश्य नावाच्या ऋषींनी कैकसी नावाच्या स्त्रीशी सूर्य अस्ताला जाताना संग केला तर रावण, बिभीषण, कुंभकर्ण जन्माला आला. तर आदिती नावाच्या ऋषीने पवित्र दिवशी संग केला तर त्याच्या पोटी हिराण्यक्षपू नावाचा राक्षस जन्माला आला. हिरण्यकक्षपूने नारायण म्हणून संग केला तर भक्त प्रल्हाद जन्माला आला, असं इंदुरीकर महाराज यांनी कीर्तनात म्हटलं होतं.


दरम्यान, निवृत्ती महाराजांच्या या वक्तव्यावर आक्षेप घेत अहमदनगरच्या PCPNDT समितीने ही नोटीस पाठवली होती. गर्भलिंग निदान निवडीची जाहिरात असून PCPNDT कायद्याच्या कलाम 22 चे उल्लंघन असल्याचा आरोप याच समितीच्या सदस्याने केला. त्यानुसार PCPNDT सल्लागार समितीने निवृत्ती महाराज इंदोरीकर यांना नोटीस पाठवून खुलासा मागितला आहे. इंदोरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी अंधश्रद्धा निर्मुलन समितीने केली होती. त्यानुसार, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. अशातच आता न्यायालयानं इंदुरीकरांना दिलासा दिला असून त्यांच्या विरोधातील खटला रद्द करण्यात आला आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :