एक्स्प्लोर
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर कारने दोन पोलिसांना उडवलं, महिला चालक ताब्यात

पुणे : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर लेन कटिंग आणि ओव्हर स्पीडची कारवाई करण्यासाठी व्हिडीओ रेकॉर्डिंग करणाऱ्या दोन वाहतूक पोलिसांना महिला चालकाने उडवलं. रेखा शहा असं महिला चालकाचे नाव असून तिला लोणावळा पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मळवलीजवळ ही घटना घडली. या घटनेत एका पोलिस कर्मचाऱ्याचा पाय फ्रॅक्चर झाला असून एक जण किरकोळ जखमी झाला आहे. मुंबईवरुन पुण्याला येताना रेखा शहा या भरधाव वेगात स्विफ्ट डिझायर कार चालवीत होत्या. यावेळी त्यांच्या गाडीचा नंबर घ्यायला पुढे आलेल्या पोलिसांना उडवलं. त्यानंतर विरुद्ध दिशेला जाऊन अन्य एका कारला धडक दिली. यानंतर पोलिसांनी रेखा शाह या महिला चालकाला ताब्यात घेतलं आहे.
Before You Go
Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















