एक्स्प्लोर
खेडशिवापूरला भीषण अपघात, कारमधील चौघांचा जागीच मृत्यू
अपघातानंतर तासाभराने कारमध्ये अडकलेल्या मृतांना बाहेर काढण्यात आलं. मृतांमध्ये तीन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे.

पुणे : भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना पुण्याजवळ घडली आहे. खेडशिवापूर टोलनाक्याजवळ उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिलेल्या कारमधील चार जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर तासाभराने कारमध्ये अडकलेल्या मृतांना बाहेर काढण्यात आलं. मृतांमध्ये तीन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. खेडशिवापूर टोलनाक्याच्या अलिकडे अर्धा किमी अंतरावर एक ट्रक रस्त्याच्या कडेला उभा होता. पुण्याहून साताऱ्याकडे जाणाऱ्या आयटेन या कारने उभ्या ट्रकला धडक दिली. कारमध्ये चालक ओंकार पोळ, अरुणा भोसले, उज्ज्वला सणस, अश्विनी असवले या चौघांचा जागीच मृत्यू झाला.
Before You Go
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















