एक्स्प्लोर
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 11/10/2017
राज्यासह देशभरातील बातम्यांचा आढावा एका क्लिकवर

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 11/10/2017 1. काश्मीरमधील बंदिपुरातील दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्राचा सुपुत्र मिलिंद खैरनार शहीद, धुळे जिल्ह्यावर शोककळा, दोन दहशतवाद्यांनाही कंठस्नान https://goo.gl/uP9x3z 2. देशभरातील पेट्रोल पंप चालकांचा 13 ऑक्टोबरचा नियोजित संप मागे, मात्र महाराष्ट्रातील संप मागे घेण्याबाबत अद्याप चर्चा सुरु https://goo.gl/w7pB4E 3. नांदेड-वाघाळा महापालिकेसाठी दुपारी 3.30 वाजेपर्यंत 46.28 टक्के मतदान, 578 उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद, अशोक चव्हाणांची प्रतिष्ठा पणाला, उद्या निकाल https://goo.gl/Ez3quV 4. काँग्रेस नगरसेविका प्रमिला पाटील यांच्या निधनानंतर मुंबईतील वॉर्ड क्रमांक 116 मध्ये पोटनिवडणूक, शिवसेना-भाजपमध्ये चुरशीची लढत, उद्या निकाल https://goo.gl/CbD5VB 5. अभिनेता अनुपम खेर एफटीआयआयचे नवे अध्यक्ष, गजेंद्र चौहान यांच्या जागी नियुक्ती, चित्रपटसृष्टीतून सरकारच्या निर्णयाचं स्वागत https://goo.gl/jvnaXy 6. पंचांग फाडून टाका सांगणारा आदेशच येणं बाकी, फटाकेबंदीवरुन उद्धव ठाकरेंची उद्विग्न प्रतिक्रिया https://goo.gl/g2gd7d तर आम्ही हिंदुत्ववादी, फटाकेबंदी करणार नाही, पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचं स्पष्टीकरण https://goo.gl/6k95hP 7. अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई झालीच पाहिजे, फेरीवाले मराठी असले तरीही हटवा, मुंबई महापालिका आयुक्तांच्या भेटीत राज ठाकरेंची मागणी https://goo.gl/NndA3J 8. मुंबईकरांनो, मयुरेशसाठी 'इथला' एक तरी वडा-पाव विकत घ्या, एलफिन्स्टन चेंगराचेंगरीत मृत्यूमुखी पडलेल्या मयुरेशच्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्याचं आवाहन https://goo.gl/KGtF3T 9. कुठेही पळा, अटक करणारच, कायदा सर्वांना समान; उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांच्यातील आनेवाडी टोलनाका राड्यावरुन विश्वास नांगरे- पाटील यांचा इशारा https://goo.gl/983AGC 10. राम रहीमची दत्तक मुलगी हनीप्रीतकडून पंचकुला हिंसाचाराच्या कटात सहभागी असल्याची कबुली, हिंसाचारासाठी सव्वा कोटी रुपये वाटल्याचंही मान्य https://goo.gl/sqcesf 11. अल्पवयीन पत्नीसोबत शारीरिक संबंध बलात्कारच, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वर्षभरात तक्रार करण्याची अट https://goo.gl/GRjJWX 12. कीटकनाशक फवारणीमुळे शेतकऱ्यांच्या मृत्यूप्रकरणी मनसेचा आक्रमक पवित्रा, यवतमाळमध्ये कृषी कार्यालयात तोडफोड https://goo.gl/ozx87N 13. नाशिकमध्ये गोदावरी आणि दारणा नदीला पूर, राज्यात मुसळधार पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान, तर पुणे, धुळे आणि मराठवाड्यातही तुफान पाऊस http://abpmajha.abplive.in/ 14. ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाच्या बसवर दगडफेक, आपली 'अतिथि देवो भव'ची संस्कृती, दगडफेकीनंतर आर. अश्विनने चाहत्यांना फटकारलं https://goo.gl/fnZwNy 15. महानायक अमिताभ बच्चन यांचा 75 वा वाढदिवस, राष्ट्रपतींसह पंतप्रधानांकडून शुभेच्छा, तर राज ठाकरेंकडून व्यंगचित्राची खास भेट https://goo.gl/Be5Ap1 Birthday Special: अमिताभ बच्चन- 75 वर्षे, 75 किस्से! https://goo.gl/QFTWGF माझा विशेष : ग्रामपंचायत निकालांचं गौडबंगाल! पाहा विशेष चर्चा आज रात्री 9.15 वाजता, @abpmajhatv वर BLOG : फूड ब्लॉगर अंबर कर्वे यांचा ब्लॉग: खादाडखाऊ : अटर्ली बटर्ली पण फक्त डिलीशअस? https://goo.gl/qZKVo4 बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर - https://www.youtube.com/abpmajhalive @abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्रिकेट
बुलढाणा
राजकारण























