एक्स्प्लोर
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 4 जुलै 2019 | गुरुवार
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटिनमध्ये
1. यंदा 7 टक्के आर्थिक विकास दर अपेक्षित, आर्थिक सर्वेक्षण अहवाल संसदेत सादर, उद्या अर्थसंकल्प सादर होणार
2. राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर केलेल्या आरोपांप्रकरणी निर्दोष असल्याचा राहुल गांधींचा शिवडी कोर्टात दावा, जामीन मंजूर
3. नितेश राणे आणि कार्यकर्त्यांनी हायवे उपअभियंत्याला गडनदी पुलावर बांधून चिखल ओतला, मुलाच्या आंदोलनाचा वडील नारायण राणेंकडून निषेध
4. संघ आणि भाजपच्या लोकांना प्रकाश आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये घेतले, वंचितचे नेते लक्ष्मण मानेंचा गंभीर आरोप तर गोपीचंद पडळकर हे संघ स्वयंसेवक असल्याचा दावा
5. स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांनी पुन्हा घेतली राज ठाकरेंची भेट, भाजप-शिवसेनेविरोधात आघाडी व्हावी याबाबत दोघांमध्ये चर्चा झाल्याची सुत्रांची माहिती
6. नवी मुंबई बॉम्बप्रकरणी तिघांना अटक, घातपात नव्हे तर बिल्डरला धमकावण्यासाठी बॉम्ब ठेवला, चुकीच्या टायमरमुळे बॉम्ब फुटला नाही
7. मॅनेजरचा 27 कोटी रुपयांच्या 58 किलो सोन्यावर डल्ला, औरंगाबादच्या वामन हरी पेठे ज्वेलर्समधील प्रकार, तिघांना अटक
8. शाळेत कुऱ्हाडीने वार करुन शिक्षिकेची हत्या करणाऱ्या पतीला दोन दिवसात अटक, पत्नी मान आणि पैसे देत नसल्यामुळे हत्या केल्याची आरोपीची कबुली
9. मी तुमच्यापेक्षा दुप्पट सामने खेळलोय, सातत्यपूर्ण कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या संजय मांजरेकरांना क्रिकेटर रवींद्र जाडेजाचं सणसणीत उत्तर
10. आषाढी यात्रेनिमित्त विठुरायाच्या 24 तास दर्शनाला सुरुवात, देवाचा पलंग निघाला, आजपासून व्हीआयपी आणि ऑनलाईन दर्शन बंद
यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
मेसेंजर m.me/abpmajha
Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBRK
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement