एक्स्प्लोर
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 31 डिसेंबर 2018 | सोमवार
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटिनमध्ये

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 31 डिसेंबर 2018 | सोमवार
- नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जय्यत तयारी, कोकण-गोव्यातील समुद्रकिनारे पर्यटकांनी फुलले, न्यूझीलंडमध्ये फटाक्यांच्या आतषबाजीत नववर्षाचं स्वागत https://goo.gl/5Eg5Tj
- भाजप नेते आशिष शेलार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात गुप्त बैठक, घरगुती बैठक असल्याची प्राथमिक माहिती, राजकीय गोटात चर्चांना उधाण https://goo.gl/U7bdBZ
- भीम आर्मीच्या चंद्रशेखर आझाद यांच्या पुण्यातील सभेला उच्च न्यायालयाचा नकार, पुणे विद्यापीठाने परवानगी नाकारल्यावर कोर्टाचे आदेश https://goo.gl/TTk8NW
- ऑगस्टा वेस्टलँडप्रकरणी काँग्रेसने स्पष्टीकरण देण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मागणी, अहमदनगर महापौर निवडणुकीत शिवसेनेला बिनशर्त पाठिंबा द्यायची तयारी होती, मात्र शिवसेनेने संपर्क केला नसल्याचाही दावा https://goo.gl/tZYJEZ
- सबळ पुराव्यांअभावी तेलगी स्टॅम्प घोटाळ्यात सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता, नाशिक सत्र न्यायालयाचा निकाल https://goo.gl/xt7v9p
- दारु पिऊन गाडी चालवताना पकडल्यास सहा महिन्यांसाठी परवाना रद्द होणार, परिवहन मंत्री आणि वाहतूक पोलिसांच्या बैठकीत निर्णय, वाहनांचा विमा नसल्यास जप्तीची कारवाई https://goo.gl/Snr9jb
- कांद्याच्या भावात प्रतिक्विंटल 300 रुपयांची वाढ, केंद्र सरकारने निर्यातमूल्याच्या अनुदानात वाढ केल्याचा परिणाम, शेतकऱ्यांना मोठा दिलासा https://goo.gl/4v2wTi
- अमरावतीतून मुंबईला विक्रीसाठी पाठवली जाणारी 10 पिस्तुलं आणि 40 काडतुसं जप्त, ठाणे गुन्हे शाखेची कारवाई, दोघे जेरबंद https://goo.gl/CJTHMQ
- धुळे महापालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवार मंगला अर्जुन यांची निवडणुकीतून माघार, महापौरपदी चंद्रकांत सोनार यांची वर्णी https://goo.gl/qus3hD
- तिहेरी तलाक विधेयक राज्यसभेत सादर, विधेयक सिलेक्ट कमिटीकडे पाठवण्याच्या मागणीसाठी विरोधक आक्रमक, राज्यसभेचं कामकाज बुधवारपर्यंत तहकूब https://goo.gl/kwFrud
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
