एक्स्प्लोर
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 24 जून 2019 | सोमवार
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटिनमध्ये
*एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 24 जून 2019 | सोमवार*
1. विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हेंची बिनविरोध निवड तर विजय वडेट्टीवार विधानसभेचे विरोधी पक्षनेते, विधानसभा अध्यक्षांची घोषणा
2. राधाकृष्ण विखे, जयदत्त क्षीरसागर, महातेकर यांच्यासह राज्य सरकारला हायकोर्टाचा तूर्तास दिलासा, मंत्रिमंडळ विस्ताराप्रकरणी याचिकेवर तातडीने सुनावणीस नकार
3. गेल्या विधानसभेला भाजपने जिंकलेल्या जागांपैकी एकही जागा सोडणार नाही, रावसाहेब दानवेंची भूमिका, युतीसाठी 50-50 चा फॉर्म्युला ठरल्याचंही स्पष्टीकरण
4. महापालिकेतील देयकांच्या तफावतीमुळे मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांच्या निवासस्थानाचं पाणीबिल थकलं, राज्य सरकारची माहिती, लवकरच थकबाकी भरणार असल्याचाही दावा
5. जलयुक्त शिवार योजनेच्या कामात गैरव्यवहार, जलसंधारणमंत्री तानाजी सावंत यांची कबुली, विभागीय चौकशीही सुरु
6. इंदिरा गांधी आणि मोदींची तुलना करताना काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरींची जीभ घसरली, इंदिरा गांधींची गंगेशी तर मोदींशी नाल्याशी तुलना, लोकसभेत गदारोळ
7. फसव्या जाहिराती केल्या तर सेलिब्रिटींना दंड, ग्राहक संरक्षण विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
8. देहूमध्ये विठूनामाच्या जयघोषात वारकरी दंग, टाळ-मृदुंगाच्या गजरात तुकोबांच्या पालखीचं देहूतून तर पैठणमधून नाथांच्या पालखीचं प्रस्थान
9. येत्या 24 तासात मुंबईसह उपनगरात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज, तर नाशिक, पुण्यासह राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाला सुरुवात
10. बिग बॉसच्या विकेंड एपिसोडसाठी सलमान खान घेणार 31 कोटींचं मानधन, 13 व्या सीझनमध्ये सलमान कमावणार तब्बल 400 कोटी
*यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv
*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv
*फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha
*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv
*एबीपी माझाच्या बातम्या आता मेसेंजरवर* m.me/abpmajha
*Android/iOS App ABPLIVE* - https://goo.gl/enxBRK
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement