एक्स्प्लोर
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 20 एप्रिल 2019 | शनिवार
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटिनमध्ये

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 20 एप्रिल 2019 | शनिवार 1. शहीद हेमंत करकरेंबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी साध्वी प्रज्ञा सिंहला निवडणूक आयोगाची नोटीस, 24 तासांत स्पष्टीकरण देण्याचे आदेश https://bit.ly/2UPol0H 2. सरन्यायाधीशांवर लैंगिक छळाचे आरोप, आरोपांमागे मोठं षडयंत्र असल्याचा सरन्यायाधीशांचा दावा, तीन सदस्यीय खंडपीठापुढे आजच तातडीची सुनावणी https://bit.ly/2UIVmf7 3. राहुल गांधींची अमेठीतून उमेदवारी रद्द करा, भाजपची मागणी, नाव आणि नागरिकत्वाचे खोटे पुरावे दिल्याचा प्रतिस्पर्धी अपक्ष उमेदवाराचा दावा https://bit.ly/2XokVPe 4. पंतप्रधान मोदींवरील सिनेमापाठोपाठ वेब सीरीजलाही बंदी, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाचा निर्णय, ईरॉस नाऊवरील स्ट्रिमिंग थांबवलं https://bit.ly/2GwPTzp 5. अब्दुल सत्तारांची काँग्रेसमधून हकालपट्टी, जालन्यात प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांची घोषणा, तर राधाकृष्ण विखेंबाबत लवकरच निर्णय घेण्याचंही सूचक विधान https://bit.ly/2GvXKwN 6. उस्मानाबादच्या नळदुर्ग किल्ल्यात बोट बुडून तीन शाळकरी मुलांचा मृत्यू, पाच जणांना वाचवण्यात यश, किल्ल्यात बोटींग करताना घडली घटना https://bit.ly/2Ixlumu 7. कोल्हापुरात सावकाराचा नवविवाहित तरुणीवर बलात्कार, तिघांविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल https://bit.ly/2DmJQv4 8. आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांच्या अपत्यांना आईची जात लावता येणार, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय https://bit.ly/2VWCJRp 9. मतदान झालेल्या दुष्काळग्रस्त भागात आचारसंहिता शिथिल करा, शेतकरी नेते किशोर तिवारींची निवडणूक आयोगाकडे मागणी https://bit.ly/2UqCpc4 10. 'कॉफी विथ करण' शोमध्ये महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी हार्दिक पंड्या आणि लोकेश राहुलला प्रत्येकी 20 लाखांचा दंड, बीसीसीआयचे लोकपाल डी के जैन यांचे आदेश https://bit.ly/2vdsRH0 *माझाकट्टा* : लोकसभा निवडणुकांच्या रिंगणात उतरलेले माढ्याचे उमेदवार रामदास माने आणि दक्षिण मुंबईचे उमेदवार डॉ. अनिलकुमार यांच्याशी गप्पा, आज रात्री 9 वाजता *यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv *इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv *फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha *ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv *मेसेंजर* m.me/abpmajha *Android/iOS App ABPLIVE* - https://goo.gl/enxBRK
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बुलढाणा
नाशिक
मुंबई






















