एबीपी माझा व्हॉट्सअप बुलेटिन | 18 नोव्हेंबर 2018 | रविवार
- मराठा आरक्षणासाठीचा मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य मंत्रिमंडळाने स्वीकारला, आरक्षण आणि दुष्काळावर अधिवेशनात चर्चा करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन https://goo.gl/vCt4R8
- अधिवेशनापूर्वीच विरोधकांकडून ''ठग्स ऑफ महाराष्ट्र''ची बॅनरबाजी, मुख्यमंत्री आमिर तर उद्धव अमिताभ यांच्या भूमिकेत, ‘ठग्स’च्या पोस्टरबाजीवरुन मुख्यमंत्र्यांकडून विरोधकांचा समाचार https://goo.gl/daJ9qy
- मागासवर्ग आयोगावर सरकारचा दबाव, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटलांची टीका, आरक्षणावरुन समाजासोबत सरकारची ठगबाजी सुरु असल्याचाही घणाघात https://goo.gl/2dzxwN
- “हर हिंदू की यही पुकार, पहले मंदिर फिर सरकार”, अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंचा नवा नारा, शिवसेना महिला आघाडी, युवासेना दौऱ्यात सहभागी नाही https://goo.gl/9CECkd
- महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेऊन दुष्काळाबाबत निश्चित कृती कार्यक्रम हाती घेण्याची शरद पवारांची मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे विनंती, दुष्काळावर मात करण्यासाठी उपाययोजनांची टिपणंही पाठवली https://goo.gl/M5tBtT
- वाढीव भूसंपादनाविनाच लातूर-जहिराबाद महामार्गाच्या कामाला सुरुवात, लातूरच्या निलंग्यातील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, जामीन नाकारल्यानं 12 शेतकऱ्यांना न्यायालयीन कोठडी https://goo.gl/eZeTzM
- बहुचर्चित मुळशी पॅटर्नचा अभिनेता दिग्दर्शक प्रविण तरडेला अज्ञातांकडून पुण्यातील कार्यालयात घुसून धक्काबुक्की, कार्यालयाचीही तोडफोड, गैरसमजातून प्रकार घडल्याचं तरडेचं मत https://goo.gl/vCt4R8
- सोलापुरात बार्शी-कुर्डुवाडी मार्गावर खासगी बस अपघातात तीन चिमुरड्यांचा मृत्यू, तर 15 हून अधिक प्रवासी गंभीर जखमी, बस चालक दारुच्या नशेत असल्याचा प्रवाशांचा दावा https://goo.gl/P6ccfH
- अमृतसरच्या निरंकारी आश्रमात ग्रेनेड हल्ला, दुचाकीवरुन आलेल्या अज्ञातांचं कृत्य, तिघांचा मृत्यू, 10 जण गंभीर जखमी, दहशतवादी हल्ल्याचा पोलिसांचा अंदाज https://goo.gl/z8ihNP
- अमेरिकेतील वेंटनोर शहरात 16 वर्षीय तरुणाकडून भारतीयाची गोळ्या झाडून हत्या, आईच्या वाढदिवसनिमित्त भारतात येण्यापूर्वीच काळाचा घाला https://goo.gl/k7RKBZ
*यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv
*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv
*फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha
*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv
*Android/iOS App ABPLIVE*
*एबीपी माझाची ब्लॉग माझा स्पर्धा* https://goo.gl/SJPPd7