एक्स्प्लोर
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 17/03/2018
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 17/03/2018

- घोटाळेबाज नीरव मोदीला अहमदनगरच्या शेतकऱ्यांचा इंगा, कर्जतमधल्या 125 एकर जमिनीवर ताबा, उद्यापासून कसायला सुरुवात https://goo.gl/SJR396
- मुंबईत शरद पवारांच्या घरी राज ठाकरेंची खलबतं, तर सदिच्छा भेट असल्याचं राज ठाकरेंचं स्पष्टीकरण, राजकीय वर्तुळात नव्या समीकरणांची चर्चा https://goo.gl/x6qnRA
- छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास लवकरच शालेय अभ्यासक्रमात, शिक्षणमंत्री विनोद तावडेंची माहिती, संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त वढू-बुद्रुकमध्ये मोठी गर्दी http://abpmajha.abplive.in/
- सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या बंगल्याची सुनावणी पुढे ढकलली, महापालिका आयुक्तच गैरहजर राहिल्याने निर्णय, याचिकाकर्त्यांना मात्र नाहक मनस्ताप https://goo.gl/3YJFz5
- सलग तिसऱ्या दिवशीही राज्याच्या अनेक भागात ढगाळ वातावरण, पुढच्या दोन दिवसात हलक्या पावसाचा हवामान तज्ज्ञांचा अंदाज, आंबा, काजूसह द्राक्ष उत्पादक शेतकरी हवालदिल https://goo.gl/jpukyx
- एकतर्फी प्रेमातून नागपूरच्या शिंगोरीत उच्चशिक्षित तरुणीची हत्या, भरदिवसा झालेल्या घटेनेनं खळबळ https://goo.gl/MoY9Ay
- 90 वर्षाच्या महिलेवर बलात्काराप्रकरणी आरोपीला मरेपर्यंत जन्मठेप, कोल्हापूर न्यायालयाचा निर्णय, 2015 मध्ये नांगरवाडी गावातलं प्रकरण https://goo.gl/h48ppm
- मुंबईत उद्या मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर विशेष मेगाब्लॉक, तर हार्बर मार्गावरील ब्लॉक रद्द, गुढीपाडव्यानिमित्त खरेदीसाठी बाहेर पडणाऱ्या मुंबईकरांची गैरसोय होणार https://goo.gl/Z8QpDP
- पुण्यातल्या फिनिक्स मॉलमध्ये तृतीयपंथीयाला मज्जाव, महिला सुरक्षारक्षकानं मॉलमध्ये प्रवेश करण्यापासून हटकलं https://goo.gl/tZLATx
- नाशिकमधील घोटी बाजार समिती स्थलांतरित केल्याने शेतकऱ्यांचा रास्तारोको, भाज्याही रस्त्यावर फेकल्या https://goo.gl/inwVCw
- ते द्वेषाचं राजकारण करतात, आम्ही प्रेमाचं, नवी दिल्लीतील काँग्रेसच्या महाअधिवेशनात राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल https://goo.gl/pkJgFM
- आगामी निवडणुका ईव्हीएमऐवजी मतदानपत्रिकांद्वारे घ्या, काँग्रेसच्या महाअधिवेशनात ईव्हीएमविरोधातील ठराव एकमताने मंजूर https://goo.gl/WuVgcv
- आइनस्टाईनच्या सिद्धांतापेक्षा अनेक उत्तम सिद्धांत वेदांमध्ये, स्टीफन हॉकिंग यांचा दाखला देऊन केंद्रीय विज्ञान मंत्री हर्षवर्धन यांचा अजब दावा https://goo.gl/r8wzuF
- सीडीआर प्रकरण : अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीच्या वकिलांना वर्सोव्यातून अटक, वारंवार समन्स बजावूनही कोर्टासमोर हजर न राहिल्याने कारवाई https://goo.gl/1U7ujw
- बांगलादेश-श्रीलंका सामन्यादरम्यान लाजिरवाणी घटना, दोन्ही संघातील खेळाडू मैदानात एकमेकांशी भिडले, शाकिब अल हसनवर कारवाईची शक्यता https://goo.gl/oAAgKv
आणखी वाचा























