एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 15/05/2018


 

  1. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष, भाजप 104 जागांवर विजयी, काँग्रेसला 78 तर देवेगौडांच्या सेक्युलर जनता दलाला 38 जागा, मायावतींच्या बसपा आणि कर्नाटक प्रज्ञावंत जनता पार्टीला प्रत्येकी 1 जागा https://goo.gl/fokmKz


 

  1. राज्यपालांची भेट घेऊन भाजपचा सत्तास्थापनेचा दावा, सर्वात मोठा पक्ष असूनही काँग्रेस-जेडीएसच्या खेळीने भाजपचा तोंडाशी आलेला घास अडचणीत https://goo.gl/fokmKz


 

  1. कर्नाटक निवडणुकीत ट्विस्ट, सर्वात कमी जागा येऊनही जेडीएसच्या कुमारस्वामींना मुख्यमंत्रीपदाची ऑफर, भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी काँग्रेस-जेडीएस एकत्र https://goo.gl/fokmKz


 

  1. कर्नाटकातील जनेतेने काँग्रेसला नाकारलं, जनतेची काँग्रेसमुक्त कर्नाटकला साथ, जनतेने नाकारुनही काँग्रेस सत्तास्थापनेचा दावा करत आहे, येडियुरप्पांची प्रतिक्रिया https://goo.gl/TqMUkZ


 

  1. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्यांचा दोनपैकी एका मतदारसंघात पराभव, बदामी मतदारसंघात विजय, तर चामुंडेश्वरीत पराभव https://goo.gl/fokmKz


 

  1. देशातील फक्त अडीच टक्के लोकांवर काँग्रेसचं राज्य, 21 राज्यांची चावी भाजपच्या हाती, काँग्रेसकडे फक्त पंजाब, पुद्दुचेरी, मिझोराम ताब्यात https://goo.gl/RVP3Pd


 

  1. ईव्हीएमचा विजय असो, राज ठाकरेंची प्रतिक्रिया, https://goo.gl/8C26B8 तर संशय दूर करण्यासाठी बॅलेट पेपरने निवडणुका घ्या, उद्धव ठाकरेंचा सल्ला https://goo.gl/6DH1TJ काँग्रेसचाही ईव्हीएमवर आक्षेप


 

  1. मराठीबहुल बेळगावात भाजप आघाडीवर, 18 पैकी 10 जागांवर भाजप, तर 8 जागांवर काँग्रेस विजयी, मराठी एकीकरण समितीला बेळगावकरांनी नाकारलं https://goo.gl/KRZPAX


 

  1. समीर भुजबळांचा जेलमधील मुक्काम वाढला, व्यस्त कामकाजामुळे सुट्टीकालीन न्यायालयाचा जामीन अर्जावर सुनावणी घेण्यास तूर्तास नकार, 21 मे रोजी पुढील सुनावणी https://goo.gl/EBkBvr


 

  1. केडगावमधील शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांडाप्रकरणी आरोपी भानुदास कोतकरला पाच दिवसांची पोलीस कोठडी, अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयाचा निर्णय http://abpmajha.abplive.in/


 

  1. 10 वर्षांनी अपत्यप्राप्ती, रुग्णवाहिकेअभावी बाळ दगावलं, गडचिरोली जिल्ह्यातील प्रकार, आरोग्य विभागाची मान खाली https://goo.gl/uEdR7n


 

  1. सिद्धूंना सुप्रीम कोर्टाचा दिलासा, तुरुंगवास टळला, सदोष मनुष्यवधाच्या आरोपातून निर्दोष मुक्त, हाणामारीच्या आरोपात फक्त एक हजार रुपयांचा दंड https://goo.gl/P1ABAE


 

  1. वारली चित्रकला जगभरात पोहोचवणारे पद्मश्री जिव्या मशे यांचं निधन, पालघरमधील राहत्या घरी अखेरचा श्वास, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली https://goo.gl/1KSWiA


 

  1. ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी पद्मश्री यमुनाबाई वाईकर यांचे निधन, सातारा जिल्ह्यातील वाईमध्ये वयाच्या 102 व्या वर्षी अखेरचा श्वास http://abpmajha.abplive.in/


 

  1. मुकेश अंबानींच्या दुसऱ्या मुलाचाही साखरपुडा होण्याची शक्यता, अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा फोटो व्हायरल झाल्यानंतर चर्चांना उधाण https://goo.gl/zFHvYT


 

*व्हायरल सत्य* : अभिनेता अजय देवगनचं हेलिकॉप्टर महाबळेश्वरमध्ये क्रॅश? https://goo.gl/mcBZVt

*BLOG* : श्रमदानासाठी परदेशातून मदत करणारे सादिकभाई, सॉफ्टवेअर इंजिनिअर सचिन अतकरे यांचा प्रेरणादायी ब्लॉग https://goo.gl/Xmhspv

*एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ* - https://www.youtube.com/abpmajhalive

*@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*