एक्स्प्लोर
Advertisement
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 12 डिसेंबर 2019 | गुरुवार
एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटिनमध्ये राज्यातील आणि देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा.
- ठाकरे सरकारचं अखेर 15व्या दिवशी खातेवाटप, गृह, नगरविकास, सार्वजनिक बांधकाम, कृषि या महत्वाच्या खात्यासह शिवसेनेकडे तब्बल 22 खाती, राष्ट्रवादीकडे अर्थ, ग्रामविकाससह 13 तर काँग्रेसकडे महसूल, शिक्षणासह 15 खाती https://bit.ly/2rE5hoP
- सर्वांचा असलेला भाजप पुन्हा मुठभर लोकांचा करु नका, पंकजा मुंडेंचा गोपीनाथगडावरून राज्य नेतृत्वावर हल्लाबोल, 26 जानेवारीपासून महाराष्ट्राचा दौरा करणार असल्याची दिली माहिती https://bit.ly/35gZIer
- पंकजा मुंडेंच्या व्यासपीठावरून एकनाथ खडसेंची खदखद, देवेंद्र फडणवीसांनी नेत्यांना त्रास दिल्याचा आरोप करत अपेक्षाभंग केल्याची भावना, पराभवासाठी षडयंत्र रचल्याचाही दावा https://bit.ly/349WF6t
- राग माणसावर काढा, पक्षावर नको, चंद्रकांत पाटलांकडून एकनाथ खडसे-पंकजा मुंडेंची समजूत काढण्याचा प्रयत्न, तक्रारींवर तोडगा काढण्याचंही आश्वासन https://bit.ly/34hD0lc
- 80व्या जन्मदिनानिमित्त मुंबईत शरद पवारांचा भव्य सत्कार, पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, तर वाढदिवसानिमित्त 80 लाख रुपयांचा निधी शेतकऱ्यांसाठी गोळा https://bit.ly/2LMMNZY
- अयोध्या प्रकरणातील सर्वच्या सर्व 19 फेरविचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या, सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाचा निर्णय, राम मंदिराचा मार्ग मोकळा https://bit.ly/2LKXtso
- नागरिकत्व दुरुस्ती विधेयक देशाच्या इतिहासात मैलाचा दगड ठरेल, गेल्या अनेक वर्षांपासून ज्या लोकांवर अन्याय झाले, त्यांचं दु:ख दूर करणारं हे विधेयक, नरेंद्र मोदींची भावना https://bit.ly/34eQAGb
- पाकिस्तानातून दिल्लीत आलेलं हिंदू कुटुंब नागरिकत्व दुरुस्ती विधेयकामुळे आनंदी, मुलीचं नाव ठेवलं 'नागरिकता' https://bit.ly/2Ebp2GV
- जाट समाजाच्या विरोधानंतर 'पानिपत'मधील 11 मिनिटांच्या सीनवर कात्री, इतिहास चुकीच्या पद्धतीने मांडल्याचा आरोप https://bit.ly/38vuB0X
- स्वीडनमधील पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गला टाइम मॅगझीनचा 'पर्सन ऑफ द इयर' पुरस्कार, 16 वर्षांच्या ग्रेटावर कौतुकाचा वर्षाव https://bit.ly/2E7laXs
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
क्रिकेट
निवडणूक
Advertisement