एक्स्प्लोर
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन | 03 डिसेंबर 2019 | मंगळवार
दिवसभरात महत्तावाच्या बातम्यांचा वेगवान आढावा
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन | 03 डिसेंबर 2019 | मंगळवार
- नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये आवक घटल्याने रिटेल मार्केटमध्ये कांदा 130 रुपये किलो जाण्याची शक्यता, तर रेशन दुकानाच्या माध्यमातून कांदा विक्रीचा केंद्र सरकारचा विचार https://bit.ly/2RlxVFT
- गोपीनाथ गडावर निमंत्रित करण्यासाठी लिहिलेल्या फेसबुक पोस्टचा विपर्यास केल्याचा पंकजा मुंडेंचा आरोप, पक्ष सोडणार असल्याच्या बातम्या निराधार https://bit.ly/2rT5EvG
- माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलांनाही दप्तर दिरंगाईचा फटका, कर्ज न घेताही 7/12 वर बोजा कायम https://bit.ly/2OKKdFP, आम्ही कर्जच घेतलं नाही, तर कोट्यवधींच्या कर्जमाफीचा प्रश्नच येत नाही, अभिनेता रितेश देशमुखचा ट्वीटद्वारे दावा https://bit.ly/34LWTBZ,
- डोंबिवलीतल्या लोकलच्या गर्दीचा मुद्दा लोकसभेत, लोकलच्या फेऱ्या वाढवण्याची राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी https://bit.ly/2LfsHYa
- कौटुंबिक त्रासाला कंटाळून ठाण्यात 50 वर्षीय व्यक्तीचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसाच्या सतर्कतेमुळे जीव वाचला, पोलीस जयवंत पवार यांना ठाणे पोलीस आयुक्तांकडून पाच हजार रुपयांचे बक्षीस https://bit.ly/2OKWwCj
- औरंगाबाद शहरातील सिडको N 1 भागात शिरलेला बिबट्या जेरबंद, सहा तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाला यश https://bit.ly/2Rf2exW
- किल्ले प्रतापगडावर शासनाकडून शिवप्रतापदिन साजरा, ढोल ताशांच्या गजरात पालखी सोहळा संपन्न https://bit.ly/34Lb36s
- इस्रोच्या महत्वाकांक्षी 'चांद्रयान 2'च्या विक्रम लॅण्डरचे अवशेष सापडले, भारतीय अभियंता षण्मुगम सुब्रमण्यम यांची नासाला मदत, नासाची ट्विटरवरुन माहिती https://bit.ly/2Y8Khm3
- जागतिक फुटबॉलमध्ये सर्वात प्रतिष्ठेचा बॅलन डी'ओर पुरस्कार अर्जेन्टीनाच्या स्टार फुटबॉलर लियोनेल मेसीला, पुरस्कार जिंकण्याची मेसीची विक्रमी सहावी वेळ https://bit.ly/2DIjR13
- चीनी स्मार्टफोन बनवणाऱ्या शाओमी कंपनीची ऑफर, एमआय क्रेडिट सर्व्हिसच्या माध्यमातून ग्राहकांना मिळणार पाच मिनिटांत एक लाखांपर्यंतचं कर्ज https://bit.ly/2Yg3XVc
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
जळगाव
करमणूक
परभणी
Advertisement