एक्स्प्लोर
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 02 ऑक्टोबर 2019 | बुधवार
दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 2 ऑक्टोबर 2019 | बुधवार
- मुख्यमंत्र्यांचे पीए अभिमन्यू पवारांना उमेदवारी दिल्याने लातुरात मोठा विरोध, निलंगेकरांच्या भावाने राष्ट्रीय महामार्ग अडवला, तर अभिमन्यू पवार संभाजी पाटील निलंगेकरांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार https://bit.ly/2nOx18d
- लातूरमध्ये अमित देशमुखांविरोधात अर्चना पाटील चाकूरकरांना उतरवण्याची तयारी, भाजपकडून उमेदवारीसाठी शिवराज पाटलांच्या सुनेला गळ https://bit.ly/2nOjyx9
- एकनाथ खडसेंचं नाव भाजपच्या दुसऱ्या उमेदवार यादीतही नसल्याची चर्चा, कन्या रोहिणी खडसे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता, सूत्रांची माहिती https://bit.ly/2mTgvmX
- ऐरोलीतून गणेश नाईक विधानसभेच्या रिंगणात, वडिलांसाठी संदीप नाईकांची माघार, बेलापूरमधून तिकीट न मिळाल्याने नाईकांचा ऐरोलीतून लढण्याचा निर्णय https://bit.ly/2nOwRxD
- आघाडीतील मित्रपक्षांना एकूण 38 जागा मिळण्याची शक्यता, शेकाप, स्वाभिमानी शेतकरी संघटनेला प्रत्येकी 10 , तर सपा आणि बच्चू कडू यांच्या प्रहारला प्रत्येकी तीन जागा मिळणार, जागावाटपाची अंतिम घोषणा प्रेस नोटद्वारे https://bit.ly/2nDUJ7k
- आदित्य ठाकरेंविरोधात राज ठाकरे वरळीत उमेदवार देणार नसल्याची माहिती, तर आदित्य यांचा उमेदवारी अर्ज भरताना मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीसाठी शिवसेनेचे प्रयत्न https://bit.ly/2pc0kls
- सोलापुरात उमेदवारी अर्ज भरण्यासाठी लेबर पार्टीच्या बशीर अहमद यांची घोड्यावरुन वरात, प्राण्याचा वापर केल्याने पोलीस गुन्हा दाखल करणार https://bit.ly/2nLPT7O
- नाशिकच्या कळवण तालुक्यात 250 शेतकऱ्यांच्या दारात नवेकोरे ट्रॅक्टर, 21 कार आणि 400 दुचाकी, कांद्याला चांगला भाव मिळाल्याने कांदा उत्पादकांना फायदा https://bit.ly/2mYVebG
- दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत सलामीवीर रोहित शर्माचं दमदार शतक, पावसाच्या व्यत्ययामुळे खेळ थांबला, पहिल्या दिवसअखेर भारताच्या बिनबाद 202 धावा https://bit.ly/2orKOBG
- राष्ट्रपिता महात्मा गांधींची आज 150वी जयंती, दिग्गजांकडून गांधींना आदरांजली तर देशभरात स्वच्छता अभियानाद्वारे श्रद्धांजली, आजपासून देशभरात प्लास्टिक बंदी https://bit.ly/2nPTZMa
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
राजकारण
व्यापार-उद्योग
सोलापूर
Advertisement