एक्स्प्लोर
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 29 डिसेंबर 2019 | रविवार
एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटिनमध्ये राज्यातील आणि देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा.
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 29 डिसेंबर 2019 | रविवार
1. ठाकरे सरकारचा उद्या पहिला मंत्रिमंडळ विस्तार, अजित पवार, धनंजय मुंडे, आव्हाड, अशोक चव्हाण शपथ घेण्याची शक्यता, तर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईला 3 मंत्रिपदं मिळण्याची शक्यता https://bit.ly/2taWU4E
2. अमृता फडणवीस आणि शिवसेनेतला वाद शिगेला, वाईट नेते मिळणं ही राज्याची चूक नव्हे, अॅक्सिस बॅंकेतली खाती वळवण्यावरुन अमृता यांचं सरकारवर टीकास्त्र https://bit.ly/39mMvDC
3. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न वाद पेटला, बेळगावात कनसेचा उन्माद सुरुच, दुकानांवरील मराठी पाट्यांची तोडफोड, तर कोल्हापुरातून कर्नाटकात जाणाऱ्या बसेस बंद https://bit.ly/2Q7cqHE
4. रायगड संवर्धनाच्या कामात भ्रष्टाचार; खासदार संभाजीराजेंचा आरोप, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून कारवाईचे आश्वासन https://bit.ly/2SCeglq
5. मुंबई महापालिका हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सची झाडाझडती घेणार, थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर आवश्यक प्रमाणपत्रांची तपासणी मोहीम https://bit.ly/2F3N4nG
6. झारखंडच्या मुख्यमंत्रीपदी हेमंत सोरेन विराजमान, काँग्रेस दोन तर आरजेडीच्या एका नेत्याचाही शपथविधी; राहुल गांधी, ममता बॅनर्जींसह अनेक नेते शपथविधीला उपस्थित https://bit.ly/2SAZDid
7. देशात राहायचं असेल तर भारत माता की जय म्हणावंच लागेल, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधानांचं वादग्रस्त विधान https://bit.ly/2ZFQsig तर दिल्लीवालोंसे डर लगता है, गुलजारांचा शाह मोदींवर निशाणा https://bit.ly/2Q5Ar1E
8. बालकांचा मृत्यू होणं यात काहीही नवीन नाही, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचं असंवेदनशील वक्तव्य, मागील काही दिवसांत राजस्थानमध्ये 10 बालकांचा मृत्यू https://bit.ly/359pTD4
9. अर्ध्या देशात गोठवणारी थंडी, दिल्लीसह सहा राज्यांमध्ये रेड अलर्ट जारी तर दिल्लीतील अनेक भागात तापमानाचा पारा 2 अंश सेल्सिअसपेक्षा खाली https://bit.ly/2SBjoGI
10. खिलाडी अक्षय कुमार आणि करीनाचा 'गुड न्यूज' चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; पहिल्या दिवशी 17.56 कोटींचा गल्ला तर दोन दिवसांत 39.34 कोटींची कमाई https://bit.ly/2stamRa
यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
हॅलो अॅप - http://m.helo-app.com/al/mUfSswxex
Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBRK
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
राजकारण
राजकारण
क्राईम
Advertisement