एक्स्प्लोर
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन | 27 नोव्हेंबर 2019 | बुधवार
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या स्मार्ट बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेतला जातो.
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 27 नोव्हेंबर 2019 | बुधवार
- उद्धव ठाकरेंच्या शपथविधी सोहळ्यासाठी शिवतीर्थ सज्ज, सोनिया गांधी उपस्थित राहणार, अरविंद केजरीवाल, ममतांनाही निमंत्रण, राज्यातील 400 शेतकऱ्यांचीही उपस्थिती https://bit.ly/2qGfFw0
- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक सुरु, शरद पवार, अजित पवार, उद्धव ठाकरेंसह सर्व नेते उपस्थित, शपथविधी आणि मंत्रिमंडळासंदर्भात चर्चा होण्याची शक्यता https://bit.ly/35FUVmN
- जे झालं ते संपलं, आता नवीन सुरुवात करायची, राष्ट्रवादीच्या बैठकीत अजित पवारांचं वक्तव्य https://bit.ly/33nRMGO तर अजित पवार उपमुख्यमंत्री व्हावेत अशी राष्ट्रवादीच्या काही आमदारांची इच्छा https://bit.ly/34tDWUo
- विधिमंडळात 286 आमदारांचा शपथविधी, विधानभवनाच्या गेटवर सुप्रिया सुळे आमदारांच्या स्वागताला, अजित पवार, आदित्य ठाकरेंची गळाभेट, काळजीवाहू मुख्यमंत्र्यांचंही केलं स्वागत https://bit.ly/2QSNJ2m
- सगळ्यांना सोबत घेऊन लढले असते तर 25 जागा वाढल्या असत्या, एकनाथ खडसेंचा भाजपला घरचा आहेर, सिंचन घोटाळ्याचे गाडीभर पुरावे रद्दीत विकल्याचाही दावा https://bit.ly/2XYNGnq
- नाट्यमय घडामोडीनंतर महाराष्ट्राच्या राज्यपालपदावरुन भगतसिंह कोश्यारींना हटवणार? कलराज मिश्र नवे राज्यपाल होण्याची शक्यता https://bit.ly/2DlXUoj
- माझं मिशन पूर्ण झालं, आता पक्षाचं काम करणार, उद्यापासून पत्रकार परिषदांमधून नाही तर ‘सामना’तूनच बोलणार, संजय राऊत यांची प्रतिक्रिया https://bit.ly/34wiOgA
- आमचं कुटुंब एक आहे आणि एकच राहिलं, अजित पवार परतल्याचा आनंद, रोहित पवारांनी व्यक्त केल्या भावना https://bit.ly/2sk6GAR
- विधानसभा निवडणुकीआधी भाजपची वाट धरलेल्या 'या' नेत्यांचं टायमिंग चुकलं! सत्तेसाठी पक्षांतर करूनही विरोधी पक्षात बसण्याची वेळ https://bit.ly/2sf7mr9
- कार्टोसॅट-3 उपग्रहाचे श्रीहरिकोटा येथून यशस्वी प्रक्षेपण, पृथ्वीच्या प्रतिमा आणि मॅपिंगसाठी ठरणार उपयुक्त, पंतप्रधान मोदींकडून वैज्ञानिकांचं अभिनंदन https://bit.ly/33sk9n4
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
व्यापार-उद्योग
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement