एक्स्प्लोर
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 23 जुलै 2019 | मंगळवार
देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 23 जुलै 2019 | मंगळवार
- आंध्रात भूमिपुत्रांना खासगी क्षेत्रात 75% आरक्षण, जगनमोहन रेड्डी सरकारचा निर्णय, देशातील पहिली घटना https://bit.ly/2JRWWTq
- सातवा वेतन आयोग आता महापालिका, नगरपरिषदा, नगर पंचायत कर्मचाऱ्यांना लागू, मंत्रिमंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय, 2 सप्टेंबरपासून सातवा वेतन आयोग लागू https://abpmajha.abplive.in
- सोलापुरात कृत्रिम पावसासाठी पहिलं विमान झेपावलं, पावसासाठी अनुकूल ढगांचा शोध सुरु, पुढचे काही दिवस विमानाद्वारे निरीक्षण सुरुच राहणार https://bit.ly/2GpXVcV
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या आमदारकीला आव्हान देणाऱ्या याचिकेवरील निकाल सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला, दोन गुन्ह्यांची माहिती लपवल्याचा आरोप, हायकोर्टाकडून आधीच क्लीन चिट https://bit.ly/2M6mAqv
- नांदेडच्या माहूरमध्ये 1900 एकर जमिनीचा वाद, राजघराण्यातील 11 जणांनी जमिनीवर दावा केल्यानं माहूरवासियांचं धाबं दणाणलं https://bit.ly/2GmMti0
- घरकूल गैरव्यवहार प्रकरणी माजी मंत्री डॉ. हेमंत देशमुख पोलिसांच्या ताब्यात, धुळ्यातील दोंडाईचा घरकूल गैरव्यवहार प्रकरणी पोलिसांची कारवाई https://bit.ly/2Gp1VKK
- मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाची माळ पुन्हा मिलिंद देवरांच्या गळ्यात पडण्याची शक्यता, तर दोन कार्याध्यक्ष म्हणून हुसेन दलवाई आणि एकनाथ गायकवाडांची चर्चा https://bit.ly/2XZ3IRw
- डोनाल्ड ट्रम्प यांच्या काश्मीरप्रश्नी मध्यस्थीच्या वक्तव्यानंतर राजकीय वातावरण तापलं, अमेरिकेकडे कोणतीही मदत न मागितल्याचं परराष्ट्र मंत्रालयाचं स्पष्टीकरण तर मोदींनी स्पष्टीकरण द्यावं अशी राहुल गांधींची मागणी https://bit.ly/2Sx5Tp9
- कर्नाटकातील राजकीय नाट्य काही तासात संपण्याची शक्यता, विश्वासदर्शक ठरावासाठी विधानसभा अध्यक्षांकडून संध्याकाळपर्यंत डेडलाईन https://abpmajha.abplive.in/live-tv
- शहीद जवान औरंगजेबचे दोन्ही भाऊ सैन्यात भरती, रांचीमधील पंजाब रेजिमेन्टल सेंटरमध्ये प्रशिक्षण सुरु https://bit.ly/30PZZSZ
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement