एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 21 डिसेंबर 2019 | शनिवार
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या व्हॉट्सअॅप बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेतला जातो.
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 21 डिसेंबर 2019 | शनिवार
- शेतकऱ्यांचं 30 सप्टेंबर 2019 पर्यंत थकीत 2 लाखांचं कर्ज माफ, विधानसभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा, मार्च 2020पासून अंमलबजावणी https://bit.ly/2SfuHE0
- तिघाडी सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, कर्जमाफीवरुन फडणवीसांचा सरकारवर हल्लाबोल, तर 25 हजारांच्या नुकसान भरपाईचाही विश्वासघात, सातबारा कोरा केला नसल्याचा आरोप करत सभात्याग https://bit.ly/2rkmfIO
- राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात मुख्यमंत्री कार्यालय उभारणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा तर समृद्धी महामार्गासाठी सरकारच पैसा उभारणार असल्याची माहिती, शिवथाळी योजनेअंतर्गत 50 ठिकाणी 10 रुपयांत जेवण सुरु करणार https://bit.ly/35M3zRd
- फडणवीसांच्या काळात राज्याची आर्थिक स्थिती उद्ध्वस्त, कॅग अहवालाची तज्ज्ञांमार्फत चौकशी करण्याची शरद पवारांची मागणी, तर देवेंद्र फडणवीसांनी आरोप फेटाळले https://bit.ly/35Vorpj
- कॅग अहवालाच्या मुद्द्यावर राष्ट्रवादीतील मतभेद सभागृहात उघड, उपयोगिता प्रमाणपत्र नाही म्हणजे घोटाळा असं मी म्हणणार नसल्याचं जयंत पाटलांचं मत तर नवाब मलिकांनी जयंत पाटलांना टोकले https://bit.ly/2tFYYSq
- आर्थिक मंदीवरुन लक्ष हटवण्यासाठी नागरिकत्व विधेयक रेटलं, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा नरेंद्र मोदी-अमित शाहांवर हल्लाबोल, तर भारत धर्मशाळा नसल्याचंही वक्तव्य https://bit.ly/2sPU8Bw
- महाविकास आघाडीचं समीकरण म्हणजे महाराष्ट्रातील मतदारांचा अपमान, राज ठाकरेंची टीका तर जनतेनं चांगला कौल दिल्यानंतरही सत्तेसाठी पक्षांनी प्रतारणा करावी, यासारखं दुर्दैव नसल्याचंही वक्तव्य https://bit.ly/2SikEhB
- मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादीचाच दबदबा राहण्याची शक्यता, उपमुख्यमंत्र्यासह गृह खातंही राष्ट्रवादीच्या वाट्याला जाणार, सूत्रांची माहिती https://bit.ly/2ZdXfj2
- महापरीक्षा पोर्टलद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षा बंद करुन महापोर्टलही तात्काळ बंद करावं, आमदार रोहित पवार यांची विधानसभेत मागणी https://bit.ly/35JKC1j
- राज्यातील हिंसक आंदोलनानंतर पोलिसांकडून कारवाईला सुरुवात, बीडमध्ये 31 जणांना अटक, हिंगोलीत 20 तर परभणीत राष्ट्रवादीच्या नगरसेवकाविरुद्ध गुन्हा, 50 जण अटकेत, शांततेसाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात https://bit.ly/2ESHXqB
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
निवडणूक
आरोग्य
गडचिरोली
Advertisement