एक्स्प्लोर
Advertisement
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 18 डिसेंबर 2019 | बुधवार
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या स्मार्ट बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेतला जातो.
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 18 डिसेंबर 2019 | बुधवार
- विधानसभेत 'सामना'च्या मुद्यावरुन गदारोळ, सामना वृत्तपत्राचा हवाला देत सत्ताधारी पक्षाला घेरण्याचा विरोधकांचा प्रयत्न, तर सत्ताधाऱ्यांकडून जोरदार प्रत्युत्तर https://bit.ly/2M43NLy
- नागपूरचे महापौर संदीप जोशींवर गोळीबार, हल्ल्यात महापौर थोडक्यात बचावले https://bit.ly/36Ny4Gp, महापौरांवरील हल्ल्याचे अधिवेशनात पडसाद, तर तपास गुन्हे शाखेकडे सोपवल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती https://bit.ly/2Z6gURJ
- नागपुरात शरद पवारांना भेटल्याच्या निव्वळ अफवा, भाजप सोडण्याचा कोणताही विचार नसल्याचं एकनाथ खडसेंचं स्पष्टीकरण https://bit.ly/34ydus7
- शिवेंद्रराजेंनी साताऱ्याजवळचा आनेवाडी टोलनाका बंद पाडला, खड्डे न बुजवल्यास खळ्ळखट्याकचा इशारा, आंदोलनानंतर टोलनाका सुरु https://bit.ly/34tdcmg
- औरंगाबाद महानगरपालिका उपमहापौर निवडणुकीत महाराष्ट्र विकास आघाडी होण्याची शक्यता तर शिवसेनेला शह देण्यासाठी एमआयएम आणि भाजप एकत्र येण्याची चर्चा https://bit.ly/2MaxqLo
- अन्नधान्यासोबतच रेशन दुकानावर मटण, चिकन, आणि मासे विकण्याचा केंद्र सरकारचा विचार, अद्याप अंतिम निर्णय नाही, तर कोल्हापुरातील मटण दरवाढीचा प्रश्न उच्च न्यायालयात https://bit.ly/38T43qo
- दिल्लीतील निर्भया बलात्कार आणि हत्याकांडप्रकरणी दोषी अक्षय ठाकूरची फाशी कायम, सर्वोच्च न्यायालयाने फेरविचार याचिका फेटाळली, निर्भयाच्या आईकडून निर्णयाचं स्वागत https://bit.ly/2M6nSkw
- अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या 20 वर्षीय तरुणीवर गोंदियात अॅसिड हल्ला, हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी, तरुणीवर नागपुरातील रुग्णालयात उपचार सुरु https://bit.ly/2S1IoGJ
- मराठमोळ्या स्मृती मानधनाचा आयसीसीच्या वन डे, ट्वेंटी-20 संघात समावेश, आयसीसीच्या वर्ल्ड इलेव्हनमध्ये मान मिळवणारी स्मृती एकमेव भारतीय महिला क्रिकेटर https://bit.ly/2rP5fuz
- विशाखापट्टणममध्ये टीम इंडियाचं विंडीजला 388 धावांचं आव्हान, सलामीवीर रोहित शर्मा, लोकेश राहुलची शानदार शतकी खेळी https://bit.ly/34DwRAd
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement