एक्स्प्लोर
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 18 मार्च 2019 | सोमवार
- गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकरांच्या पार्थिवावर मिरामारमध्ये अंत्यसंस्कार, लाडक्या नेत्याच्या अखेरच्या प्रवासाला जनसागर लोटला, सर्वसामान्यांसह राजकीय नेत्यांकडून साश्रू नयनांनी निरोप https://goo.gl/bYwDYx
- पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून पर्रिकरांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण, कुटुंबीयांचंही सांत्वन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, निर्मला सीतारामन, सुरेश प्रभू, नितीन गडकरींसह केंद्रीय मंत्री अंत्यदर्शनाला https://goo.gl/G3LTiY
- मुख्यमंत्र्यांच्या निधनानंतर गोव्यात राजकीय घडामोडींना वेग, मुख्यमंत्रिपदासाठी भाजपकडून प्रमोद सावंतांचं नाव चर्चेत, श्रीपाद नाईकही इच्छुक https://goo.gl/NV24YJ
- काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी नरेंद्र मोदींच्या बालेकिल्ल्यात, गंगा पूजनानंतर बोटीने प्रवास, चौकीदार फक्त श्रीमंतांचा असतो, प्रियांकांचा मोदींवर निशाणा https://goo.gl/XHhtfV
- गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकर सिंह वाघेला यांच्या घरी चोरी, चौकीदारावर संशय https://goo.gl/QCAgp2
- निवडणुकांच्या काळात समाजमाध्यमांवर अंकुश ठेवण्यासाठीची नियमावली अंतिम टप्प्यात, केंद्रीय निवडणूक आयोगाची हायकोर्टात माहिती https://goo.gl/by9ocv
- मुंबईतल्या वरळीजवळ समुद्रात रेवती टग बोट बुडाली, सातपैकी सहा जणांची सुखरुप सुटका, एक बेपत्ता https://goo.gl/NU6516
- म्हाडाच्या घरांसाठीची 21 एप्रिलची सोडत पुढे ढकलली, लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर सोडत जाहीर होणार https://t.co/IDFYSzktvZ
- पुलवामा हल्ल्यानंतर नौदलही सज्ज, अरबी समुद्रात विमानवाहू युद्धनौका तैनात https://goo.gl/zvt6rs
- मुंबईसह राज्यभरात तापमानात वाढ, विदर्भ-मराठवाड्यात पारा 37 ते 41 अंशांदरम्यान, उन्हात फिरताना काळजी घेण्याचं आवाहन https://goo.gl/K3jx4K
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
क्रिकेट
भविष्य
राजकारण
Advertisement