एक्स्प्लोर
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 16 नोव्हेंबर 2019 | शनिवार
एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटिनमध्ये राज्यातील आणि देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा.
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 16 नोव्हेंबर 2019 | शनिवार
- राज्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत जाहीर, कोरडवाहू शेतीसाठी हेक्टरी आठ हजार तर बागायतीसाठी 18 हजारांची मदत https://bit.ly/2Kqcuik
- शिवसेना एनडीएतून बाहेर पडण्याची फक्त औपचारिकता बाकी, संजय राऊतांचं वक्तव्य https://bit.ly/2QqEPsK तर राज्यसभेतील शिवसेना खासदारांची आसन व्यवस्था बदलण्याची शक्यता विनायक राऊतांकडून व्यक्त https://bit.ly/355akwA
- शरद पवारांच्या पुण्यातल्या निवासस्थानी भाजप आमदार जयकुमार गोरे, मात्र भेटीचं पवार-गोरेंकडून खंडन, गोरे मोदीबागेत गेल्याने चर्चांना उधाण https://bit.ly/2Xu76QV
- काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना नेत्यांची राज्यपालांसोबतची आजची भेट रद्द, मात्र उद्या दिल्लीत शरद पवार आणि सोनिया गांधी भेटणार https://bit.ly/2KrnKLC
- राष्ट्रपती राजवटीआड घोडेबाजार भरवण्याचे भाजपचे मनसुबे, सामनातून टीकास्त्र, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरुन निशाणा https://bit.ly/33P1xP8
- महाशिवआघाडीची सत्ता समीकरणे जुळत असल्याने भाजपला धास्ती, नाशिक महापौरपदाच्या निवडणुकीआधी नगरसेवक अज्ञातस्थळी, फोडफोडीच्या भीतीने खबरदारी https://bit.ly/32PevLC
- राफेल प्रकरणी मोदी सरकारवर आरोप करणाऱ्या राहुल गांधींनी माफी मागावी, भाजपकडून राज्यभरात निदर्शने https://bit.ly/2XlCUqX
- मुंबईतील पाणी देशात सर्वात शुद्ध तर दूषित हवेसोबतच दिल्लीतील पाणी देशातील सर्वात अशुद्ध, ब्युरो ऑफ इंडियन स्टँण्डर्डचा अहवाल https://bit.ly/2XlBHjp
- व्हॉट्सअपवरील फोटो एडिट करुन तरुणींना ब्लॅकमेल करणाऱ्या आरोपीला बेड्या, तीन मुलींना करत होता ब्लॅकमेल https://bit.ly/32PkOhZ
- इंदूर कसोटीत टीम इंडियाचा दणदणीत विजय, बांगलादेशचा एक डाव 130 धावांनी पराभव, कर्णधार म्हणून सर्वाधिक वेळा एक डाव राखून जिंकण्याचा विक्रम विराटच्या नावे https://bit.ly/2Kszttk
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
क्रिकेट
बॉलीवूड
महाराष्ट्र
Advertisement