एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 15 जानेवारी 2020 | बुधवार
एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटिनमध्ये राज्यातील आणि देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा.
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 15 जानेवारी 2020 | बुधवार
1. फडणवीस आणि ठाकरे सरकारची शपथविधीच्या सोहळ्यांवर कोट्यवधींची उधळण, ठाकरे सरकारकडून रोषणाईसाठी पावणेतीन कोटींचा खर्च https://bit.ly/30lL9EM
- लोक ‘जाणता राजा’ म्हणतात, मी कुणालाही सांगितलं नाही; जाणता राजा शब्द रामदास स्वामींचा, शरद पवारांचं साताऱ्यात वक्तव्य, उदयनराजेंनाही टोला https://bit.ly/2RmyHAL
- शिवरायांचे वंशज असल्याचे पुरावे उदयनराजेंनी दाखवावेत, शिवसेना खासदार संजय राऊत यांचं जोरदार प्रत्युत्तर, तर शिवेंद्रराजे आणि प्रसाद लाड यांचा राऊत यांच्यावर पलटवार https://bit.ly/2TsJJXM तर दाऊदला दम दिल्याचा संजय राऊतंचा दावा https://bit.ly/35Xik2C
- इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची उंची 100 फुटांनी वाढणार, स्मारक दोन वर्षात पूर्ण करणारच, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा निर्धार https://bit.ly/2FPu7FB
- शिवडी-न्हावाशेवा जोडणाऱ्या ट्रान्स हार्बर प्रकल्पाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन, मुंबई-उरण 2 तासांचं अंतर 20 मिनिटांवर येणार, सर्वात मोठा सागरी पूल 2022 पर्यंत पूर्ण होण्याची आशा https://bit.ly/35Tvwpw
- चंद्रपूर जिल्ह्यातील दारुबंदी उठण्याची शक्यता, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अधिकाऱ्यांमध्ये चर्चा, अवैध दारुविक्री-महसूल नुकसानीमुळे बंदी उठवण्याचा विचार https://bit.ly/38aSPMK
- शिर्डी साईंच्या जन्मस्थानावरुन नव्या वादाची शक्यता, परभणीतल्या पाथरीला मुख्यमंत्र्यांकडून 100 कोटींचा निधी, पाथरीला मूळ जन्मस्थान दर्जा देण्यास शिर्डीकरांचा मात्र विरोध https://bit.ly/2u5WFbh
8. निर्भया प्रकरणातील आरोपींना 22 जानेवारीला फाशी नाही, दोषींची क्युरेटिव्ह याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्याने फाशी लांबणीवर https://bit.ly/2sv6PSC
- बॉलिवूड अभिनेत्री झायरा वासिमचा विमानात विनयभंग केल्याप्रकरणी आरोपी दोषी, तीन वर्षांची शिक्षा, आरोपीला जामीन मंजूर, शिक्षेलाही स्थगिती https://bit.ly/2RwcCjp
- आयसीसीच्या पुरस्कारांमध्ये भारतीय क्रिकेटपटूंचाच बोलबाला; रोहित शर्मा, विराट कोहली, दीपक चहरचा गौरव https://bit.ly/2RhsbuV
ब्लॉग : 'आपलं गिरगाव' कॅलेंडर साकारताना... : एबीपी माझाचे अश्विन बापट यांचा ब्लॉग https://bit.ly/2tiw7Uc
यट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
हॅलो अॅप - http://m.helo-app.com/al/mUfSswxex
Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBRK