एक्स्प्लोर
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 14 ऑक्टोबर 2019 | सोमवार
देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 14 ऑक्टोबर 2019 | सोमवार
- बीसीसीआयच्या अध्यक्षपदी सौरव गांगुलीची नियुक्ती निश्चित, मुंबईतील अनौपचारिक बैठकीत निर्णय घेतल्याची सूत्रांची माहिती https://bit.ly/2MDcA6J
- भारतीय वंशाच्या अभिजीत बॅनर्जींसह, एस्थर डुफलो आणि मायकल क्रेमर यांना 2019चा अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर, दारिद्र्य निर्मूलनासंदर्भात केलेल्या संशोधनाचा गौरव https://bit.ly/2MeRSuN
- उद्धव ठाकरेंच्या भाषणासाठी उस्मानाबादेतल्या जिल्हा परिषद शाळेची कंपाऊंड भिंत तोडली, विद्यार्थ्यांच्या अकरावीच्या परीक्षाही लांबणीवर https://bit.ly/31fCmTG
- कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणाचा तपास एसआयटीकडून काढून घ्या, पानसरे कुटुंबीयांची मुंबई उच्च न्यायालयात मागणी https://bit.ly/2VMZ6tm
- अयोध्या प्रकरणाचा निकाल लवकरच येण्याची शक्यता, अयोध्येत 144 कलम लागू, तर 200 शाळा 10 डिसेंबरपर्यंत बंद, सुरक्षा व्यवस्थेतही वाढ https://bit.ly/35yh1bs
- बाळासाहेब ठाकरे यांच्या अटकेचा प्रश्न मिटलाय, आज ईडी याच्या-त्याच्या डोक्यावर बसलीय, तो फोकस बदलू नका, बाळासाहेब ठाकरेंच्या अटक प्रकरणी छगन भुजबळ यांचं स्पष्टीकरण https://bit.ly/35x7FN7
- विधानसभेला 175 जागा जिंकू, अजित पवारांना विश्वास, तर भाजप-शिवसेनेच्या आश्वासनांवर टीकास्त्र https://bit.ly/2Mf5S87
- माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांच्या कारकीर्दीमुळे भाजप-शिवसेनेची सत्ता यायला मदत झाली, यवतमाळ जिल्ह्यातील वणीमधून राज ठाकरेंचा पृथ्वीराज चव्हाणांवर निशाणा https://bit.ly/2VDTYaG
- नितेश आणि माझ्यात कोणतेही मतभेद नाहीत, मी मरेन तेव्हाच नितेश राणेची साथ सोडेन, माझ्या ट्वीटचा अर्थ वेगळा घेतला, निलेश राणेंचं स्पष्टीकरण https://bit.ly/319RTEx
- मध्यप्रदेशातील होशंगाबाद येथील भीषण अपघातात चार हॉकीपटूंचा मृत्यू, मेजर ध्यानचंद हॉकी स्पर्धेत सामना खेळायला जाताना चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने अपघात https://bit.ly/35x7H7V
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
रायगड
क्रिकेट
क्रिकेट
Advertisement