एक्स्प्लोर
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 12 ऑक्टोबर 2019 | शनिवार
देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर
*एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 12 ऑक्टोबर 2019 | शनिवार*
1. लढाई पैलवानांमध्ये होते, इतरांमध्ये नाही, बार्शीतल्या सभेत शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना उत्तर, टीकेदरम्यान पवारांनी केलेल्या हातवाऱ्यावर भाजपची टीका https://bit.ly/2B7KoDH
2. बाळासाहेबांच्या अटकेबद्दल माफी मागावी, खासदार संजय राऊतांची मागणी, एबीपी माझाच्या ‘तोंडी परीक्षा’ कार्यक्रमातील अजित पवारांच्या कबुलीनाम्यानंतर राजकारण तापलं https://bit.ly/2oEka9d
3. दहा रुपयात जेवण, एक रुपयात रक्त तपासणी, विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेच्या वचननाम्याचं ‘मातोश्री’वर प्रकाशन, राज्य चालवायला दिलंय की स्वयंपाकाला, शरद पवारांचं टीकास्त्र https://bit.ly/32bvCaK
4. पीएमसी बँकेचे ठेवीदार राज ठाकरेंच्या दारी, पैसे काढण्यासाठी निर्बंध लावल्याने ग्राहकांची अडचण तर ठाण्यात मुख्यमंत्र्यांसमोर पीएमसी बँकेच्या खातेदारांची निदर्शनं https://bit.ly/33s7VLs
5. तामिळनाडूमध्ये महाबलीपुरमच्या समुद्रकिनारी पंतप्रधान मोदींची साफसफाई, हॉटेल कर्मचाऱ्यांनाही स्वच्छतेचा संदेश, तर शी जिनपिंग यांच्याशी चर्चा https://bit.ly/33sYuvB
6. वाडा-भिवंडी मार्गावर अनेक तासांपासून रास्ता रोको, खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातांच्या विरोधात स्थानिक आक्रमक, दोन दिवसांत खड्ड्यांचे दोन बळी https://bit.ly/2MzdSPZ
7. बेकायदेशीरपणे गर्भपातप्रकरणी मंगळवेढ्याचे माजी आमदार किसनलाल मर्दा यांच्या डॉक्टरपुत्राला अटक, दोन गर्भपात करुन तिसरा करण्याच्या तयारीत असताना छापा टाकून डॉ. श्रीकांत मर्दा यांना बेड्या https://bit.ly/2OE5gdw
8. राज्याच्या अनेक भागात परतीचा पाऊस, सांगोल्यात नदीनाले दुथडी भरुन, तर मनमाडमध्ये पावसामुळे कांद्याचं नुकसान, पालघरमध्ये भातशेतीला फटका https://bit.ly/2IJGnt7
9.फोर्ब्सच्या श्रीमंत भारतीयांच्या यादीत सलग बाराव्या वर्षी मुकेश अंबानी अव्वल स्थानावर, तर टॉप फाईव्ह श्रीमंतांमध्ये तीन गुजरातींचा समावेश https://bit.ly/33okhV1
10. आर अश्विन, उमेश यादवची टिच्चून गोलंदाजी, पुणे कसोटीत दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 275 धावांवर आटोपला, भारताकडे 326 धावांची आघाडी https://bit.ly/32eerFC
*माझा कट्टा* : अभिनेते शरद पोंक्षे यांच्यासोबत गप्पा, आज रात्री 9 वाजता
*यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv
*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv
*फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha
*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv
*Android/iOS App ABPLIVE* - https://goo.gl/enxBRK
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
रायगड
क्रिकेट
क्रिकेट
Advertisement