एक्स्प्लोर
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 11/06/2018
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटीनमध्ये

*एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 11/06/2018*
- माझ्या बागेतील आंबे खाऊन अनेकांना मुलं झाली, नाशिकमधील सभेत संभाजी भिडेंचं अजब विधान https://goo.gl/fjRt7L भिडेंच्या वक्तव्यावरुन सोशल मीडियावर विनोदाचा पाऊस https://goo.gl/MPu5FD
- एकाच कुटुंबातील पाच जणांच्या हत्येने नागपूर हादरलं, तीक्ष्ण हत्याराने पवनकर कुटुंबातील वृद्धेसह दोन मुलांचा खून, मेहुण्यावर हत्येचा संशय https://goo.gl/PVkhVb
- उस्मानाबाद-बीड-लातूर विधानपरिषद निकालाचा मार्ग मोकळा, अपात्र ठरवलेल्या दहा नगरसेवकांची मतं एकत्रित करुन मोजण्याचे हायकोर्टाचे आदेश, उद्या मतमोजणी https://goo.gl/CHJDvh
- मुंबईत मंत्रालयाबाहेर बबन झोटे नावाच्या धुळ्यातील व्यक्तीचा अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने अनर्थ टळला http://abpmajha.abplive.in/
- कोल्हापुरातील पंचगंगा नदी चोरीला गेली, हातकणंगलेतल्या ग्रामस्थांच्या तक्रारीने पोलिसही अवाक्, नदीवरील जलपर्णीच्या विळख्याकडे लक्ष वेधण्यासाठी गावकऱ्यांची शक्कल https://goo.gl/cUVmim
- बारबालांना लपवण्यासाठी शौचालयात गुहा, IPS शिवदीप लांडे यांची मुंबईतील बारवर धडक कारवाई, 12 बारबालांसह 18 अटकेत https://goo.gl/GvA95K
- भाजपविरोधी सर्व पक्षांनी एकत्र येण्याच्या शरद पवारांच्या प्रस्तावावर शिवसेनेत तीन मतप्रवाह, तर पवारांचं वैयक्तिक मत असल्याचं सांगत काँग्रेसची सावध भूमिका https://goo.gl/nXZgfY
- 2019 च्या लोकसभा निवडणुकीत संघाकडून एनडीएचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून प्रणव मुखर्जींना पुढे केलं जाऊ शकतं, शिवसेना खासदार संजय राऊत यांचा अंदाज https://goo.gl/rMJRby
- पेशवेकालीन पगडी राष्ट्रवादी काँग्रेसमधून हद्दपार, यापुढे फुले पगडीनेच स्वागत करण्याचा शरद पवारांचा निर्णय https://goo.gl/avF5pR
- काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी उद्या मुंबईत, आरएसएसविरुद्धच्या वक्तव्याप्रकरणी भिवंडी कोर्टात हजर राहणार, तर दुपारी तीन वाजता कार्यकर्त्यांना संबोधणार http://abpmajha.abplive.in/
- दिवाळीपर्यंत सोन्याचा दर वधारण्याची शक्यता, डॉलरच्या तुलनेत रुपया घसरल्याने सोनं प्रति तोळा 34 हजारांवर जाण्याची चिन्हं https://goo.gl/ykiYJu
- मुलुंडमधील संभाजीराजे मैदानाच्या काँक्रिटीकरणाला परवानगी कशी, मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला सवाल, उद्या सर्व कागदपत्र सादर करण्याचेही आदेश https://goo.gl/iEmQr7
- गोव्याच्या कळंगुट बीचवर अकोल्याचे पाच जण बुडाले, तीन मृतांमध्ये एका पोलिसाचा समावेश, दोघांचा शोध सुरु https://goo.gl/dMJaUL
- ‘सैराट’चा हिंदी रिमेक 'धडक'चा ट्रेलर रिलीज, जान्हवी कपूर, इशान खट्टरची प्रमुख भूमिका असलेला सिनेमा 20 जुलैलला प्रदर्शित होणार https://goo.gl/mxTvPN
- तेची साहेब ओळखावे, 'ठाकरे' सिनेमातील नवाजुद्दीनचा नवा लूक समोर, बाळासाहेबांची हुबेहुब छबी पाहून चाहतेही भारावले https://goo.gl/14RjV5
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
पुणे
राजकारण























