एक्स्प्लोर
Advertisement
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन | 10 डिसेंबर 2019 | मंगळवार
एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटिनमध्ये राज्यातील आणि देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा
*एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 10 डिसेंबर 2019 | मंगळवार*
- नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाबाबत स्पष्टता येत नाही तोपर्यंत राज्यसभेत पाठिंबा देणार नाही, शिवसेनेची भूमिका, विधेयकाची राज्यसभेतील वाट बिकट https://bit.ly/38rM9Ld
- राज्यात सत्ता स्थापनेच्या 13 दिवसांनंतरही महाराष्ट्र विकास आघाडीचं खातेवाटप जाहीर नाही; गृह, नगरविकास, गृहनिर्माण खात्यावरुन खातेवाटप रखडल्याची सूत्रांची माहिती https://bit.ly/2E5N6Lf
- नाराज एकनाथ खडसेंच्या गाठीभेटी सुरुच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर पुढची भूमिका स्पष्ट करणार, खडसेंची माहिती, तर पंकजा मुंडे यांच्यासोबत तब्बल दोन तास चर्चा https://bit.ly/2E5OgGB
- दिल्लीत निर्भया गँगरेप प्रकरणातील दोषींना 16 डिसेंबरलाच फासावर लटकवण्याची शक्यता, आरोपी पवनला तिहारमध्ये हलवलं, बिहारच्या बक्सर जेलला फाशीसाठी दोरखंड बनवण्याच्या सूचना तर यूपी, महाराष्ट्रात जल्लादाचा शोध https://bit.ly/2seEXkY
- निर्भया फंडच्या त्वरित विनियोगासाठी कार्यपद्धती तयार करा, महिलांवरील अत्याचारासंदर्भात पोलिस महासंचालकांसोबतच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आदेश https://bit.ly/38tD0lF
- आता टू व्हीलरवर बसणाऱ्या चिमुरड्यांनाही हेल्मेटसक्ती, अपघातांच्या पार्श्वभूमीवर मोटार वाहन कायद्यामध्ये सुधारणा https://bit.ly/348BTEv
- भारतातील पहिले फिरते पोटविकार केंद्र महाराष्ट्रात सुरु, गरीब रुग्णांना लाभ होणार, पद्मश्री डॉ. अमित मायदेव यांची संकल्पना https://bit.ly/359SIjs
- कोल्हापुरातील मटण दराच्या आंदोलनावर तोडगा, 480 रुपये किलोने मटण विकण्यावर एकमत, कोल्हापूरकरांची मागणी खाटीक समाजाकडून मान्य https://bit.ly/348ydCH
- खराब हवामानामुळे 24 दिवस बंद असलेली शिर्डी विमानसेवा उद्यापासून पुन्हा सुरु होणार, सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर भाविकांना दिलासा https://bit.ly/2LHHpHH
- अंतर्मन हेलावणारा 'छपाक'चा ट्रेलर रिलीज, दीपिका पादूकोण अॅसिड हल्ला पीडितेच्या भूमिकेत https://bit.ly/2PAd274 तर अजय देवगणच्या ‘तानाजी’ चित्रपटाच्या मराठी ट्रेलरवर प्रेक्षकांची नाराजी, वाद टाळण्यासाठी काही संवाद, दृश्यांना मात्र कात्री https://bit.ly/349ELki
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पालघर
राजकारण
क्राईम
मुंबई
Advertisement