एक्स्प्लोर
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 08.06.2018
- दहावीचा निकाल जाहीर, राज्यात 89.41 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, कोकण विभागाचा सर्वाधिक, तर नागपूर विभागाचा सर्वात कमी निकाल https://goo.gl/2VemrZ
- राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांचा अघोषित संप, प्रवाशांचे प्रचंड हाल, ठिकठिकाणी आंदोलक ताब्यात, काही कर्मचाऱ्यांचं निलंबन https://goo.gl/Wpw6KT
- परेल डेपोत संपकाळात एसटी बाहेर काढल्याने चालकालाच एसटी कर्मचाऱ्यांची मारहाण, नांदेडमध्ये एसटीवर दगडफेक https://goo.gl/Wpw6KT
- कामगारांबाबत प्रश्नांची उत्तरं देणं टाळलं, ‘एबीपी माझा’च्या कार्यक्रमातून परिवहन मंत्री दिवाकर रावतेंचा काढता पाय https://goo.gl/19or6q
- माजी पंतप्रधान राजीव गांधींप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हत्या घडवण्याचा माओवाद्यांचा कट, पुरावे हाती आल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती https://goo.gl/YgkT5x
- आम्ही बदला घेऊ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह कुटुंबीयांना धमक्या, नक्षलवादविरोधी कारवाईनंतर दोन धमकीपत्रं मंत्रालयात आल्याची माहिती https://goo.gl/DhTW1x
- भीमा-कोरेगाव हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्या राहुल फटांगडेच्या मारेकऱ्यांचं छायचित्र जारी, चौघा आरोपींना शोधण्याचं पोलिसांचं आवाहन https://goo.gl/HkKHex
- लोकसभेसाठी शिवसेना-भाजपची युती होणार, उद्धव ठाकरे आणि अमित शाहांच्या बैठकीत तोडगा झाल्याची माहिती, संजय राऊत मात्र स्वबळावर ठाम https://goo.gl/tovWk2
- शिवसेना मंत्री रामदास कदम यांनी मला आयुष्यातून उठवण्याचा विडा उचलला होता, सेना खासदार अनंत गीते यांचा औरंगाबादेत दावा https://goo.gl/mBhmnY
- मान्सून महाराष्ट्रात दाखल, येत्या 24 तासात राज्यभरात सक्रिय होण्याचा अंदाज, तर मुंबईत अतिवृष्टीचा इशारा goo.gl/DSf913
- लातूरमध्ये मुसळधार पावसामुळे वीजपुरवठा खंडित, औसा तालुक्यातील पूल पहिल्याच पावसात वाहून गेला http://abpmajha.abplive.in/live-tv
- डीएसकेंचे पुत्र शिरीष कुलकर्णींचा अटकपूर्व जामीन मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला, मात्र 18 जूनपर्यंत अंतरिम दिलासा https://goo.gl/tdBns4
- नवी मुंबईच्या आगरी-कोळी भवनात जूनअखेरीस आयोजित नऊ विवाह सोहळे रद्द करा, मतमोजणीसाठी हॉल घेतल्यामुळे निवडणूक आयोगाचे आदेश https://goo.gl/LSGVce
- प्रसिद्ध पार्श्वगायिका पलक मुच्छलला फोनवरुन धमकी, बिहारचा 30 वर्षीय प्राध्यापक मुंबईत अटकेत https://goo.gl/8Prwy4
- अभिनेता शाहरुख खानची चुलत बहीण पाकिस्तानातून निवडणूक लढवणार, आवामी नॅशनल पार्टीकडून पेशावरमधून उमेदवारी https://goo.gl/kz1vVC
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement