एक्स्प्लोर
एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 फेब्रुवारी 2020 | शुक्रवार
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

*एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 फेब्रुवारी 2020 | शुक्रवार*
- मुस्लिम आरक्षणासाठी ठाकरे सरकार अध्यादेश काढणार, मंत्री नवाब मलिकांची घोषणा, तर मुस्लिम आरक्षणामुळं ओबीसीसह मराठा आरक्षणही धोक्यात, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल https://bit.ly/2wT5XsF
- ओबीसी जनगणनेसाठी ठाकरे सरकारच्या प्रस्तावाला विरोधी पक्षाचा देखील पाठिंबा, पंतप्रधान मोदींची भेट घेऊन तोडगा काढण्याची दर्शवली तयारी https://bit.ly/2wcrX1u
- पाच दिवसांच्या आठवड्याच्या निर्णयाविरोधात सोलापुरातील सामाजिक कार्यकर्त्याची उच्च न्यायालयात याचिका, उद्यापासून सरकारी कार्यालयामध्ये निर्णयाची अंमलबजावणी https://bit.ly/32z5WG9
- 19 जिल्ह्यात कर्जमाफीच्या अंमलबजावणीत ग्रामपंचायत निवडणुकांचा अडसर, आचारसंहितेमुळं कर्जमाफी दोन महिने रखडण्याची चिन्हं https://bit.ly/32ykkyx
- शिवरायांचा अपमान करणाऱ्या अहमदनगरच्या श्रीपाद छिंदमचं नगरसेवकपद रद्द, राज्य सरकारचा निर्णय, छिंदम सुनावणीला अनुपस्थित राहल्यानं कारवाई https://bit.ly/2whf5a4
- आठ महिन्याच्या गर्भवती असतानाही नमिता मुंदडांचा अधिवेशनात सक्रिय सहभाग, गरोदर असताना कामकाजात सहभागी होणाऱ्या पहिल्याच महिला आमदार असल्याची माहिती https://bit.ly/2I62Eka
- बजेटमध्ये 600 कोटींची तरतूद करुनही पुण्यात कचराकोंडी, फुरसुंगीच्या रहिवाशांचं आंदोलन कायम, प्रकरण गळ्याशी येताच पालिकेकडून घाईनं कंत्राट मंजूर https://bit.ly/3caOmNb
- बांगलादेशी-पाकिस्तानी घुसखोरांची माहिती द्या, पाच हजार रुपये मिळवा, मनसेची औरंगाबादमध्ये पोस्टरबाजी https://bit.ly/2uC3xhi
- अंनिस आणि पुरोगामी संघटनांच्या विरोधानंतर इंदोरीकरांचं कोल्हापुरातलं कीर्तन रद्द, दबावापोटी नव्हे तर वेळेअभावी कार्यक्रम रद्द केल्याचा आयोजकांचा दावा https://bit.ly/2VuPp4E
- जगाची अर्थव्यवस्था कोरोनाच्या कचाट्यात, सोन्याचे दर 46 हजाराच्या घरात पोहोचण्याची भीती, शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे 5 लाख कोटी बुडाले https://bit.ly/396sXmc
आणखी वाचा























