एक्स्प्लोर
एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 मार्च | बुधवार
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 मार्च 2020 | बुधवा 1.देशात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 28 वर, 16 परदेशी आणि 12 भारतीय नागरिकांना कोरोनाची लागण केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांची माहिती https://bit.ly/2vu6MIl तर महाराष्ट्रात एकही रुग्ण नाही, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं स्पष्टीकरण https://bit.ly/3asqbIq 2. कॅगच्या अहवालात सिडकोच्या कामावर गंभीर ताशेरे, नवी मुंबई विमानतळाच्या कामातही अनियमितता, तर अहवाल 2013 ते 2018 दरम्यानच्या कामावर असल्याचा फडणवीसांचा दावा https://bit.ly/2vFXTv0 3. परभणीतील सेलूचे नगराध्यक्ष तर पालमच्या उपनगराध्यक्षांचं भाजपमधून निलंबन, सीएएविरोधात ठराव संमत करणं महागात, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची कारवाई https://bit.ly/32PqOZP 4. मुंबईतील अनेक झोपडपट्ट्या धोकादायक स्थितीत, जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाचा निष्कर्ष https://bit.ly/2uVZ4X2 5. बलात्कारासह अॅट्रॉसिटीचा गुन्हा रद्द करण्यासाठी हायकोर्टात गेलेल्या नरेंद्र मेहतांना दिलासा, 20 मार्चपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे हायकोर्टाकडून निर्देश https://bit.ly/3avyzXl 6. निर्भयाच्या दोषींच्या फाशीचा मार्ग मोकळा, चौथ्या आरोपीची दया याचिकाही राष्ट्रपतींनी फेटाळली, लवकरच नवं डेथ वॉरंट निघणार https://bit.ly/2wrpJLO 7. गोंदियातल्या मोरवाही गावात दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा खून, मराठीचा पेपर देऊन घरी परततानाची घटना, पूर्ववैमनस्यातून हल्ला झाल्याचा संशय https://bit.ly/3auPp98 8. 'एमएमआरडीए'कडून मोनोला उभारी देण्यासाठी नवी शक्कल; वाढदिवस, लग्नसोहळ्यांसाठी डबे भाड्याने देणार https://bit.ly/38lm4fQ 9. महाविद्यालयीन शिक्षकांचं मुंबईत आंदोलन, वाढीव पदांची भरती करण्याची मागणी, आंदोलनामुळे बारावीच्या निकालासाठी उशीर होण्याची चिन्हं https://bit.ly/2TjWWBH 10. मध्य प्रदेशात राजकीय घडामोडींना वेग, गुरुग्रामच्या हॉटेलात मध्यरात्री ‘हाय व्होल्टेज ड्रामा’,ऑपरेशन लोटस सुरु असल्याची चर्चा https://bit.ly/32Tsa5N BLOG | तारक मेहतावाल्यांची हिंमत होते कशी? , एबीपी माझाचे राहुल खिचडी यांचा ब्लॉग https://bit.ly/2Toxrzf *यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv *इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv *फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha *ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv *हॅलो अॅप* - http://m.helo-app.com/al/mUfSswxex *Android/iOS App ABPLIVE*- https://goo.gl/enxBRK
आणखी वाचा























