एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 सप्टेंबर 2020 | सोमवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 सप्टेंबर 2020 | सोमवार
- भिवंडीत तीन मजली इमारत कोसळली, दहा जणांचा मृत्यू तर 19 जणांची सुखरुप सुटका, बचावकार्य सुरु https://bit.ly/3hPZr83 मृतांच्या कुटुंबियांना सरकारकडून 5 लाख रुपये https://bit.ly/2Ejt9o0
- सरकारच्या अहंकाराने संपूर्ण देशाला आर्थिक संकटात ढकललं, राहुल गांधींचा सरकारवर निशाणा https://bit.ly/2FM7sOc
- कृषी विधेयकाच्या विरोधात राज्यसभेत गोंधळ घालणाऱ्या आठ खासदारांचं निलंबन, अधिवेशनाच्या उर्वरित कामकाजात सहभागी होऊ शकणार नाहीत https://bit.ly/2FGJpjQ
- मराठा आरक्षणावरची अंतरिम स्थगिती हटवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात विनंती अर्ज, मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाणांची माहिती https://bit.ly/2RKw4Jt
- मराठा समाजातील बड्या नेत्यांना नावापुढे बॅकवर्ड लागेल याची भीती वाटते, चंद्रकांत पाटलांचा शरद पवारांवर नाव न घेता निशाणा https://bit.ly/32MKOxK
- मुंबईत लोकल सुरु करण्यासाठी मनसेचा सविनय कायदेभंग, संदीप देशपांडेंचा लोकल प्रवास! https://bit.ly/32MhffP
- एबीपी माझा डिजिटल इम्पॅक्ट, रुग्णांवर किती ऑक्सिजन वापरावा यावर बंधन नाही, आरोग्यमंत्र्याकडून स्पष्ट https://bit.ly/2ZWGg6f
- ताजमहाल 188 दिवसानंतर पर्यटकांसाठी खुला, पर्यटकांना सोशल डिस्टन्सिंग आणि इतर नियम पाळणे बंधनकारक https://bit.ly/35UruAL
- अभिनेत्री पायल घोषचे दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिक शोषणाचे आरोप; राधिका आपटे, रिचा चढ्ढासह पहिल्या पत्नीकडून अनुरागचं समर्थन https://bit.ly/2HgVNqZ
- विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा आज सनराईझर्स हैदराबादशी सामना, पहिल्या विजेतेपदाच्या निर्धारानं यंदा विराटसेना मैदानात https://bit.ly/2RJlDFY
*BLOG* | कोरोना, लॉकडाऊन आणि क्रिकेट : ख्रिस गेलला का बसवलं आणि अजिंक्य रहाणेचं घोडं अडलं कुठे? एबीपी माझाचे प्रतिनिधी विजय साळवी यांचा ब्लॉग https://bit.ly/2HljvT5
*BLOG* | चित्रपटसृष्टी सॉफ्ट टार्गेट... एबीपी माझाचे प्रतिनिधी चंद्रकांत शिंदे यांचा ब्लॉग https://bit.ly/33FObFW
*युट्यूब चॅनल* - https://www.youtube.com/abpmajhatv
*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv
*फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha
*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv
*टेलिग्राम* - https://t.me/abpmajhatv
*Android/iOS App ABPLIVE* - https://goo.gl/enxBR
Before You Go
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
महत्त्वाच्या बातम्या






















