एक्स्प्लोर
एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 जुलै 2020 | मंगळवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

1. राजस्थानच्या सत्तासंघर्षात काँग्रेसकडून आक्रमक कारवाई, बंड करणाऱ्या सचिन पायलट यांची उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षपदावरुन हकालपट्टी, सत्य को परेशान किया जा सकता है, पराजीत नही.. बंड फसलेल्या सचिन पायलट यांची ट्वीटरवर प्रतिक्रिया
2. सीबीएसई दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार, निकाल फक्त वेबसाईटवर ; तर मार्कशीट, सर्टिफिकेट डिजिलॉकरवर उपलब्ध होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्र्यांची ट्वीटरवर घोषणा
3. सीबीएसई-आयसीएसईचे निकाल लागले.. महाराष्ट्र बोर्डाचा दहावी-बारावीचा निकाल कधी लागणार? राज्यातल्या विद्यार्थी आणि पालकांना निकालाची प्रतीक्षा
4. कृषीविद्यापीठाच्या गुणपत्रिकेवर कोविड-19 असा उल्लेख केल्याची कृषीमंत्री दादा भुसे यांच्याकडून गंभीर दखल, मार्कशीटवर कोविडचा शिक्का नसेल, याची विद्यार्थ्यांना ग्वाही, चौकशीचेही आदेश
5. पुणे, पिंपरी चिंचवड मध्ये आजपासून कडक लॉकडाऊन, लॉकडाऊनच्या काळात विद्यापीठासमोरील उड्डाण पुलाच्या पाडकामाला सुरुवात
6. कोरोना लॉकडाऊनचा एसटी महामंडळाला अभूतपूर्व फटका,113 दिवसात तेवीसशे कोटींचा महसूल बुडाला; कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी 500 कोटी रुपये देण्यांची इंटकची मागणी
7. सांगलीत हल्ला झाल्याचा बनाव करत पोटच्या मुलाच्या खुनाचा प्रयत्न, आईच्या फिर्यादीनंतर शिक्षक पित्याला अटक
8. सम-विषम तारखेऐवजी पूर्ण सहा दिवस दुकाने सुरु ठेऊ देण्याची मुंबईतील व्यापाऱ्यांची मागणी, लॉकडाऊनमुळे व्यवसायावर विपरित परिणाम म्हणून नवे नियम नकोत
9. भारताला इराणचा धक्का, चाबहार रेल्वे प्रकल्पातून बाहेर काढलं! भारताऐवजी चीनच्या गुंतवणुकीला इराणचं प्राधान्य
10. आयुष्यभर तुझ्यावर प्रेम करेन! सुशांतच्या आत्महत्येनंतर रिया चक्रवर्तीची भावनिक पोस्ट, सुशांतच्या आत्महत्येला एक महिना पूर्ण झाल्यानंतर आठवणींना उजाळा देणारी पोस्ट
Blog | मुंबईची 'तब्येत' सुधारतेय! पत्रकार संतोष आंधळे यांचा ब्लॉग
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv
Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBRenxBR
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भारत
राजकारण
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
