एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 मे 2020 | सोमवार

1. उद्यापासून 15 पॅसेंजर ट्रेन्स प्रायोगिक तत्वावर सुरू करणार, आजपासून आयआरसीटीसीवर बुकिंग सुरू, नवी दिल्लीला जोडणाऱ्या 15 शहरांसाठीच ट्रेन

2. देशभरात आतापर्यंत 20,917 लोक उपचारानंतर कोरोनामुक्त, रिकव्हरी रेट 31.15 टक्के तर देशातील कोरोनाबाधीतांची संख्या आता 67 हजार 152 वर, आरोग्य मंत्रालयाची माहिती 

3. राज्यातंर्गत एसटी सेवेसंदर्भात टप्प्याटप्प्यानं निर्णय घेऊ, परिवहन मंत्री अनिल परब यांची माहिती

4. राज्यात जवळपास 25 हजार कंपन्यांमध्ये उत्पादनाला सुरुवात, सुमारे सहा लाख कामगारांच्या हाताला पुन्हा काम, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची माहिती

5. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा विधानपरिषदेचा अर्ज दाखल, तर नीलम गोऱ्हे, शशिकांत शिंदे, अमोल मिटकरींचाही अर्ज, काँग्रेस उमेदवार राजेश राठोड यांना अर्ज भरण्यास विलंब 

6. दिल्लीतून 16 मे रोजी UPSCच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष ट्रेन, जवळपास 1600 विद्यार्थी स्वगृही परतणार 

7. वाशी एपीएमसीमुळे 200 हून अधिकांना कोरोना संसर्ग, आजपासून एक आठवडा एपीएमसी बंद 

8. कोरोनामुळे महाराष्ट्रात हजारापेक्षा जास्त पोलिसांना कोरोनाची लागण, सात मृत्युमुखी तर मागील 24 तासात 221 पोलिसांना कोरोनाची लागण 

9. कोरोनाच्या लढ्यात भारताचं मोठं यश, आयसीएमआर आणि एनआयव्हीकडून स्वदेशी एलीसा अँटीबॉडी टेस्ट किटची निर्मिती 

10. अमेरिकेसोबत रशियातही कोरोनाबाधितांची संख्या वाढली, रशियातील कोरोनाबाधितांची संख्या सव्वा दोन लाखांवर तर अमेरिकेत 80 हजार मृत्यूमुखी 

BLOG | सलाम ! कोविड युद्धातील रणरागिणींना , पत्रकार संतोष आंधळे यांचा ब्लॉग 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम  - https://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv

हॅलो अॅप -  http://m.helo-app.com/al/mUfSswxex

Android/iOS App ABPLIVE -  https://goo.gl/enxBRK