सांगली : सांगलीत अडकलेल्या तामिळनाडूच्या 480 जणांना घेऊन एस.टीच्या 16 बस 9 मे ला रात्री उशिरा तामिळनाडूकडे रवाना झाल्या होत्या. त्या मुलांना तामिळनाडूमधील सेलम बहुभागत सोडून या बसमधून तामिळनाडूमध्ये अडकलेले महाराष्ट्रचे तरुण -तरुणी आणण्याचे मोठे काम राज्य सरकार आणि सांगली जिल्हा प्रशासनाने एस टी विभागाने करुन दाखवले आहे.
इतर राज्यातून मुले येत असलेली ही पाहिलीच वेळ आहे. 16 पैकी 6 बसमधून 180 तरुण जे तामिळनाडू मध्ये रेल्वचे प्रशिक्षणार्थी होते. त्यांना सांगलीत आणले गेले आहे. वास्तविक तामिळनाडूच्या 480 जणांना सोडून या बस रिकाम्या सांगलीत आल्या असत्या. मात्र राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनाने तामिळनाडू सरकारशी समन्वय साधत जे महाराष्ट्र मधील विविध भागांतील तरुण जे तामिळनाडूमध्ये अडकले आहेत. त्याची लिस्ट बनवली त्यांना या बसमधून महाराष्ट्रात आणण्याची सोय केली. या सर्व तरुण- तरुणीचे तामिळनाडूमधील रेल्वेचे प्रशिक्षण पूर्ण देखील झाले होते.
कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर झाला आणि ही सर्व मुले तामिळनाडूमध्ये मागील दीड महिन्यापासून अडकून होती. अनेक दिवस परराज्यात अडकून पडल्यने भीती वाटत होती. मात्र आता महाराष्ट्रामध्ये आल्याचे मोठे समाधान असल्याचे या तरुण-तरुणींनी सांगितले आहे. आता या तरुण-तरुणीना आता त्याच्या त्याच्या शहरात नियोजनबद्ध रित्या सोडण्यात येणार आहे.
जवळपास 5000 लोकांना परराज्याच्या सीमेवर सोडलं
एसटीने एका दिवसात जवळपास पाच हजार लोकांना परराज्याच्या सीमेवर सोडल्याचं अनिल परब यांनी सांगितलं. "जे लोक परराज्याच्या सीमेवर जाऊ इच्छित आहे, त्यांना आजही एसटी मोफत आहे. गेल्या दोन दिवसांपासून जे चित्र उभं राहिलं होतं जे लोक चालत निघाले आहेत, अशा लोकांना आम्ही एसटीच्या माध्यमातून आपल्या राज्याच्या सीमेवर सोडण्याचं काम केलं आहे. काल एका दिवसात 250 ते 275 बसमधून जवळपास 5000 लोक परराज्याच्या सीमेवर सोडलं. तर तीन हजार प्रवाशांना आपल्या राज्याच्या सीमेवरुन त्यांच्या जिल्ह्यात सोडलं, अशी माहिती परब यांनी दिली.
संबंधित बातम्या :