एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 जून 2020 | गुरुवार


1. महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन, कुलाबा वेधशाळेची माहिती, पुढील वाटचालीसाठी अनुकूल वातावरण असल्यानं अनेक भागात मुसळधार पावसाचा इशारा


2. शरद पवार-मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंमध्ये तासभर बैठक, उद्ध्वस्त कोकणाची पाहणी केल्यानंतर पॅकेजबाबत चर्चेची शक्यता 


3. शरद पवारांना माझ्या खांद्यावरून 'वांद्र्याच्या सिनियर आणि बारामतीच्या ज्युनियर'ला काही सांगायचं असेल, देवेंद्र फडणवीस यांचं शरद पवारांना प्रत्युत्तर 


4. राज्याचे मुख्य सचिव अजॉय मेहता, नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या बदलीसाठी काँग्रेस आग्रही, मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा


5. राजू शेट्टी यांना राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेच्या आमदारकीची ऑफर, ऑफरबाबत पुढील आठवड्यात निर्णय होणार 


6. श्री क्षेत्र आळंदी प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर, माऊलींच्या मंदिरालगत कोरोनाग्रस्त महिलेचा मृत्यू, पालखींच्या प्रस्थानावेळी आलेल्यांवर कारवाई होणार 


7. पोलिसांना उपचार मिळण्यासाठी नवी मुंबई पोलिसांकडून कोविड सेंटरची उभारणी, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पाहणी तर मिशन पोलीस स्टेशन अंतर्गत प्राथमिक तपासणीसाठी डॉक्टर आपल्या दारीची टीम पोलीस स्टेशनमध्ये 


8. नागपूर आयुक्त तुकाराम मुंडे आणि पोलिसांत पुन्हा जुंपली, तलाव परिसरात कोरोना पसरवणारी बिर्याणी पार्टी झालीच नाही, पोलिसांचा दावा


9. डेरिंगबाज आजीला सलाम! नाशिकमध्ये चार वर्षाच्या नातीला 60 वर्षीय आजीने बिबट्याच्या तावडीतून धाडसानं वाचवलं 


10. औरंगाबादेतील बहीण-भावाच्या हत्येचा उलगडा, घरातील सोन्यासाठी चुलत भावानंच भावोजीच्या मदतीनं हत्या, आरोपींना अटक


BLOG | समजदारो को इशारा काफी, पत्रकार संतोष आंधळे यांचा ब्लॉग