एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 एप्रिल 2020 | शनिवार


1. महाराष्ट्रातला लॉकडाऊन 30 एप्रिलपर्यंत वाढवला , कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय, काही भागात लॉकडाऊन अधिक कडक करण्याचेही संकेत 

2. लॉकडाऊनमधून शेती आणि मत्स्य व्यवसायाला वगळलं, केंद्राचा महत्वपूर्ण निर्णय, मात्र देशभरातील ट्रेन आणि विमानसेवा राहणार बंद 

3. वेळेत लॉकडाऊन केलं नसतं तर देशात कोरोनाबाधितांची संख्या 8 लाखांहून अधिक असती, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा अंदाज, देशात कोरोनाबाधितांची संख्या 7447 वर, 24 तासात तब्बल 40 मृत्यू ; कम्युनिटी ट्रान्समिशन नाही

4. धान्य पुरवठा करणार्‍या कामगारांना विम्याचे कवच, धान्याचा पुरवठा करणाऱ्या सर्व कर्मचार्‍यांना आणि एफसीआयच्या कामगारांना जीवन विमा संरक्षण देण्याचा केंद्राचा निर्णय 

5. शासकीय कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी पैशांचा तुटवडा, राज्य सरकारला कर्ज काढावं लागण्याची शक्यता, राज्याला 40 हजार कोटींचा महसुली तोटा

6. कोरोनामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी संकटात, द्राक्षाचा बेदाणा करण्याची वेळ, तर लॉकडाऊनमुळे कोकणातील आंबा सडण्याची भीती 

7. लॉकडाऊनमध्ये बर्थडे पार्टी करणाऱ्या पनवेलमधील भाजप नगरसेवक अजय बहिरा यांच्यावर गुन्हा तर आमदार अनिल भोसलेंच्या भावाचा लॉकडाऊनमध्ये मुंबई-पुणे प्रवास

8. पुणे, नवी मुंबई पाठोपाठ कोल्हापुरातही कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाला विक्री बंद, गर्दी वाढल्यानं निर्णय

9. पुण्यातल्या मशिदीत 17 तबलिगींचं नमाज पठण, रविवार पेठेतला धक्कादायक प्रकार, फरासखाना पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

10. जगभरात कोरोनामुळे 100 दिवसात 1 लाखांपेक्षा जास्त बळी, अमेरिकेत पाच लाखांहून अधिक कोरोना रुग्ण, इटली, अमेरिकेत प्रत्येकी 18 हजार बळी, दक्षिण कोरियात निगेटिव्ह झालेल्या 91 रुग्णांना पुन्हा कोरोनाची लागण

BLOG : कोरोना विरुद्ध 'नो कोरोना' आजार, पत्रकार संतोष आंधळे यांचा ब्लॉग

BLOG : प्लाझ्मा थेरपीची बाराखडी, राहुल कुलकर्णी यांचा ब्लॉग

माझा कट्टा : महाराष्ट्राची माय सिंधुताई सपकाळ माझा कट्ट्यावर, आज रात्री 9 वाजता, फक्त एबीपी माझावर