मुंबई : मुंबईसह काही शहरात परिस्थिती अद्याप नियंत्रणात आली नसल्याने महाराष्ट्रात तरी 14 एप्रिलनंतरही लॉकडाऊन वाढवणार असल्याचा निर्णय घेतल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. महाराष्ट्राने नेहमीच देशाचे नेतृत्व केलं आहे. या कोरोना संकटातही महाराष्ट्र ठाम उभा राहून जगाचं नेतृत्व करेल असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. त्यामुळे किमान 30 एप्रिलपर्यंत राज्यात लॉकडाऊन वाढवत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या संकटामध्ये सर्व राज्ये देशाच्या पाठीशी उभा आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील सर्व राज्यांना योग्य त्या सूचना देत आहेत. यात राजकारण आणू नये ही विनंती आहे. राजकारण आपण आयुष्यभर करत आलो. मात्र, राजकारण करण्याची ही वेळ नसल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले.


आजच्या या बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील नागरिकांना संबोधित करण्याची शक्यता आहे. हे लॉकडाऊन नसून लोकइन असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. उद्याच्या उज्वल भारतासाठी माणसांचा जीव सर्वकाही आहे. त्यामुळे लॉकडाऊन कायम राहणार आहे. या काळात सर्व बॉर्डर बंद राहतील. जे कामगार अडकले आहेत, तेही राज्य सोडून जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले. संपूर्ण देशात कोरोनाबाबत एकच भूमिका राहणार असल्याचंही ते म्हणाले. आता लॉकडाऊन काढले तर जे मिळवले ते सर्व जाईल, असे ट्विट दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलं आहे. त्यामुळे लॉकडाऊन वाढणार असल्याचं त्यांनी सांगितले. या वाढलेल्या कालावधीचे स्वरूप कसे असेल, मजूर व कामगारांचे काय तसेच उद्योगांसाठी काय करायचे या बाबी 14 एप्रिलपर्यंत आम्ही स्पष्ट करीत आहोत. येत्या 14 एप्रिलला देशातील लॉकडाऊन संपणार आहे. मात्र, काही राज्यांनी हे लॉकडाऊन वाढण्याची विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. दरम्यान, 14 नंतर 30 एप्रिल पर्यंत हा लॉकडाऊन राहील पण 14नंतर साधारणतः काय करणार याच्या सूचना मग शाळा आणि विद्यापीठांच्या परीक्षा, उद्योगधंद्यांच काय होणार याची सगळ्यांची उत्तरे मी आपल्याला 14 तारखेपर्यंत देणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.



कोरोनासाठी चीन इतकंच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनही जबाबदार : सामाजिक कार्यकर्त्या आभा सिंग


पंतप्रधानांच्या बैठकीत काय झालं?
आज पंतप्रधानांची राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसमवेत व्हिडीओ कॉन्फरन्स झाली. वर्षा निवासस्थानाहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहभागी होऊन संवाद साधला. यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख, आरोग्यमंत्री राजेश टोपे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुख्य सचिव अजोय मेहता उपास्थित होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रथम पंतप्रधानांना राज्यातील कोरोना परिस्थितीबाबत अवगत केले. ते म्हणाले की राज्यातील चाचणी गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. सुमारे 33 हजार चाचण्या घेण्यात आल्या असून 1574 जणांचे नमुने पॉझिटिव्ह आहेत तर 30 हजार 477 जणांचे निगेटिव्ह आहेत. 188 रुग्ण बरे करून घरी पाठवले आहेत.


Lockdown extend in Maharashtra | महाराष्ट्रात किमान 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे