मुंबई : देशात लॉकडाऊन असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडीत दोन शेकरूंची शिकार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. गेल्या आठवड्यात ही घटना घडूनही वन विभागाने या प्राण्यांची शिकार केलेल्या शिकाऱ्यास अटक केलेली नाही. लॉकडाऊनमुळे न्यायालय बंद असल्याचे कारण पुढे करुन अधिकारी शिकाऱ्याला अटक करण्यास चाल ढकल करत आहेत. महत्त्वाचे म्हणजे 'वन्यजीव संरक्षण कायद्या'अंतर्गत शेकरूला वाघाच्या दर्जाचे संरक्षण लाभले असून तो महाराष्ट्राचा 'राज्यप्राणी' आहे.


लॉकडाऊनच्या काळात राज्यातील वन्यजीव सुरक्षित आहेत का ? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. कारण सावंतवाडी तालुक्यातील माडखोल गावातील जंगलात दोन शेकरूंची शिकार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. शिकार केलेल्या प्राण्यांसह शिकाऱ्याने काढलेले छायाचित्र व्हॉटसअॅप स्टेटस एबीपी माझ्याच्या हाती लागले आहे. ही घटना 1 ते 3 एप्रिल दरम्यान घडली असून शिकाऱ्याचे नाव लिलाधर वराडकर असल्याची माहिती एका स्थानिक रहिवाशाने माहिती दिली. शिकाऱ्याने बंदुकीच्या साहाय्याने दोन शेकरुंना ठार केले. त्यानंतर मृत शेकरुसोबत छायाचित्र काढून ते समाजमाध्यमांवर टाकले.


वन्यजीव संरक्षण कायद्याच्या प्रथम श्रेणीत शेकरु या प्राण्याला संरक्षण लाभले आहे. प्रथम श्रेणीतील प्राण्यांची शिकार केल्यास सात वर्षांची शिक्षा आणि दंडाची तरतूद आहे. सावंतवाडीत घडलेल्या या प्रकरणाची माहिती 3 एप्रिल रोजी सिंधुदुर्ग वन विभागाला देण्यात आली. मात्र अद्याप शिकाऱ्याला वन विभागाने अटक केली.



शेकरु हा महाराष्ट्रचा राज्यप्राणी आहे. सदाहरित, निम सदाहरित व नदी काठच्या जंगलात शेखरु आढळतो. आंबा, काजू, फणस ही फळ खाऊन याच झाडांवर शेकरुला राहायला आवडते. सिंधुदुर्ग जिल्हा वनविभागाने माझाच्या बातमीनंतर तात्काळ अटक करत त्याला व्यायालयात हजर केले जाणार आहे

Coronavirus | Lockdownमधून शेती, मत्स्य शेतीला सूट; गृहमंत्रालयाकडून नव्या सूचना



संबंधित बातम्या :