एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 एप्रिल 2020 | मंगळवार

1. पुढील 19 दिवस घरीच थांबा, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढवला तर विमान, रेल्वे सेवा रद्द, आयपीएलही लांबणीवर पडणार

2. ज्येष्ठ नागरिकांसाठी केंद्र सरकारची नियमावली, घराबाहेर न पडण्याचं आवाहन, घरातल्या घरात हलके व्यायाम करण्याचाही सल्ला 

3. जगाच्या, मानवजातीच्या कल्याणासाठी कोरोनाची लस शोधण्यासाठीचा विडा उचलावा, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं देशातील वैज्ञानिकांना आवाहन 

4.देशात कोरोनाबाधितांचा आकडा 10 हजार 363 वर, देशात 24 तासांत 31 जणांचा मृत्यू, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती तर राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा अडीच हजारांवर; एकट्या मुंबईत 1632 रूग्ण

5. कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमितीची बैठक, कोरोनाचा प्रादुर्भाव नसलेल्या जिल्ह्यात उद्योगधंदे सुरु करण्याबाबत चर्चा

6. पुण्यातील ससून रुग्णालयात आज 4 कोरोना रुग्णांचा मृत्यू, नर्सलाही कोरोनाची लागण, नागपुरात आज 7 नवे रूग्ण, रत्नागिरीत 6 महिन्यांच्या बाळाला कोरोना 

7. कोरोनामुळे शेतकऱ्यांवर संकट, व्यापारीच फिरकत नसल्यानं भाजी, मिरची, कलिंगड, आंबा, काजू उत्पादक हवालदिल, पीकांवर ट्रॅक्टर फिरवण्याची वेळ 

8. शहरी नक्षलवाद आणि भीमा कोरेगाव प्रकरणी प्राध्यापक आनंद तेलतुंबडे मुंबईत तर गौतम नवलखा दिल्लीत एनआयए पुढे शरण, शरण येताच दोघांनाही अटक 

9. पुण्यातील कचरा वेचणाऱ्या महिलेचं औदार्य, कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि दोन सेवाभावी संस्थांना एकूण 15 हजारांची मदत 

10. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदींसह अनेकांकडून अभिवादन, संविधानाच्या प्रस्तावनेचं वाचन, मेणबत्ती प्रज्वलित करुन अनुयायांकडून घरातच आंबेडकर जयंती साजरी

BLOG | 3 मे नंतर भेटू? पत्रकार संतोष आंधळे यांचा ब्लॉग 

BLOG | कोरोना संकट आणि बेसुमार लोक, गणेश पोकळे यांचा ब्लॉग

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv


इन्स्टाग्राम  - https://www.instagram.com/abpmajhatv


फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv


हॅलो अॅप -  http://m.helo-app.com/al/mUfSswxex


Android/iOS App ABPLIVE -  https://goo.gl/enxBRK