ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 जून 2021 | गुरुवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
![ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 जून 2021 | गुरुवार abp majha top 10 headlines corona news update 24 june 2021 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 जून 2021 | गुरुवार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/06/24/b8e24fd45ea939ecd6ac6627e2cc13e7_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 जून 2021 | गुरुवार
- नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचं नाव देण्यासाठी स्थानिकांचा एल्गार, ऑगस्टपर्यंत विमानतळाला दि. बा. पाटलांचं नाव द्या अन्यथा 16 तारखेपासून विमानतळाचं काम बंद पाडण्याचा इशारा https://bit.ly/3zTrvl1
- पुण्यातील आंबिलओढा परिसरातील बांधकामांवर महापालिकेची कारवाई, अनेक संसार उघड्यावर, रहिवासी आक्रमक, आत्मदहनाचा प्रयत्न https://bit.ly/3gShGwk तोडक कारवाईमुळे विस्थापित होणाऱ्यांचं राजेंद्रनगर परिसरात पुनर्वसन करण्याचं महापालिकेचं स्पष्टीकरण https://bit.ly/3gQElsM स्थानिकांच्या विरोधानंतर कारवाई स्थगितीचे मंत्री एकनाथ शिंदेंचे निर्देश https://bit.ly/3xJDuQ4
- मुंबईत 2 हजार 53 जणांना बोगस लसीकरण झाल्याची पालिकेकडनं कबुली, आरोपींवर कठोर करवाई करण्याचे हायकोर्टाचे निर्देश https://bit.ly/3qlrFNL
- मुकेश अंबानी यांची मोठी घोषणा! गुगल आणि जिओचा संयुक्त फोन गणेश चतुर्थीला येणार; जगातील सर्वात स्वस्त फोन असल्याचा दावा https://bit.ly/3jmM7wn लवकरच 5G नेटवर्कचं लाँचिंग https://bit.ly/3gT9prQ यावर्षीपासून जिओ इन्स्टिट्यूटला सुरुवात https://bit.ly/3xTxwfP
- एक जरी मृत्यू झाला तर... बारावी परीक्षा आयोजित करण्याच्या आंध्र प्रदेश सरकारच्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाची तंबी https://bit.ly/2Sn5NF4
- कोरोना लसीकरणासाठी पंतप्रधानांच्या आभाराचे पोस्टर लावा; UGC चे देशातल्या विद्यापीठांना आदेश https://bit.ly/3h74eUi
- घाईघाईने निर्बंध शिथिल करू नका, धोका पत्करु नका, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सूचना https://bit.ly/3vW8fQy तर डेल्टा प्लस व्हेरिएंटचा प्रभाव वाढण्याची शक्यता, राज्यांनी खबरदारी घ्यावी, केंद्राचे निर्देश https://bit.ly/2SpfwuH
- पुण्यात मास्कचा गैरवापर करत पत्नीची मालमत्ता हडपली, महिलेच्या मदतीने बायकोची पॉवर ऑफ अॅटर्नी स्वत:च्या नावावर https://bit.ly/3d6byhp
- अनुसूचित जातीतील 10 वीच्या परीक्षेत 90 टक्के गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना मिळणार 2 लाखांचे अनुदान, धनंजय मुंडे यांची घोषणा https://bit.ly/3dbqN8Z
- अँटीव्हायरस क्षेत्रातील गुरु आणि McAfee चे संस्थापक John McAfee यांचा स्पेनच्या जेलमध्ये मृत्यू, गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा संशय https://bit.ly/3xPIGSA
*ABP माझा ब्लॉग*
BLOG | काँग्रेसला वगळून तिसरी आघाडी बनणे अशक्य, एबीपी माझाचे प्रतिनिधी चंद्रकांत शिंदे यांचा ब्लॉग https://bit.ly/3h1zrIj
*ABP माझा स्पेशल*
वटपौर्णिमा : साडेपाच एकरात पसरलेलं साताऱ्याच्या म्हसवे गावातील विस्तीर्ण वडाचं झाडं https://bit.ly/3xG4IHw
न्यूझीलंड कसोटी क्रिकेटचा जगज्जेता! भारताचा 8 विकेट्सनं पराभव करत जिंकली पहिली वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप https://bit.ly/3xMMfsF
Corona Update India : देशात गेल्या 24 तासांत 50 हजारांहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद, तर सक्रिय रुग्णसंख्या 6 लाखांहून अधिक https://bit.ly/3xLDOOo
Maharashtra Corona Cases : मंगळवारच्या तुलनेत बुधवारी कोरोनाबाधित वाढले, 10,066 नवीन कोरोनाबाधित तर 11,032 डिस्चार्ज https://bit.ly/3gRJroP
Special Report : कोरोनामुळे तरुणीने मित्राला गमावलं ; मित्र येईल या आशेनं 'ती' आजही वाट पाहते https://bit.ly/2SlUVHs
*युट्यूब चॅनल* - https://www.youtube.com/abpmajhatv
*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv
*फेसबुक* – https://www.facebook.com/abpmajha
*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv
*टेलिग्राम* - https://t.me/abpmajhatv
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)