ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 एप्रिल 2025 | शनिवार 



1) महाराष्ट्रात 5023 पाकिस्तानी नागरिक, 107 जण बेपत्ता, फक्त 51 जणांकडे वैध व्हिसा अन् कागदपत्रे, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती https://tinyurl.com/4h8tan8r  पाकिस्तानी नागरिकांना शोधून काढा आणि तात्काळ परत जातील याची खात्री करा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना निर्देश https://tinyurl.com/49tv2nza नागपूर शहरात सर्वाधिक 2 हजार 458 पाकिस्तानी नागरिक, तर ठाणे शहरात 1106 पाकिस्तानी नागरिक, कोणत्या जिल्ह्यात किती संख्या? https://tinyurl.com/ycyfx9fa

Continues below advertisement


2) काश्मीरातील पाच दहशतवाद्यांची घरं ब्लास्ट करुन उद्ध्वस्त, पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय लष्कर आक्रमक, सर्च ऑपरेशन जारी https://tinyurl.com/mrx7p9tn पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगला स्थगिती; पर्यटकांना खोऱ्यात प्रवेश करण्यास बंदी https://tinyurl.com/bdddfsvu


3) भारताच्या प्रत्येक हल्ल्याला तोडीस तोड उत्तर, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचं वक्तव्य, सिंधू नदीचे पाणी अडवताच पाकिस्तान बेचैन https://tinyurl.com/y7t4bmvw सिंधू घाटीत एकतर पाणी वाहणार किंवा त्यांचे रक्त; पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री आणि पाकिस्तान पीपल्स पार्टी (PPP) चे प्रमुख बिलावल भुट्टो झरदारी यांची भारताला धमकी https://tinyurl.com/5cjnrxz6 पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डर बंद, मात्र पाकिस्तानी उच्च आयोगातील अधिकाऱ्यांचा वाघा बॉर्डरवरूनच जाण्याचा अट्टहास, भारताकडे मागितली परवानगी https://tinyurl.com/j9matj6h


4) कागदोपत्री घोडे नाचवणं थांबवा, तुम्ही ठोस कारवाई करणार आहात का? वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांचा केंद्र सरकारला सवाल https://tinyurl.com/jke4uc3p  पहलगामधील दहशतवादी हल्ल्यामध्ये 'संधी' शोधण्याचा विमान कंपन्यांचा नालायकपणा, दिल्लीपर्यंतचे 15 हजारांचे तिकीट दर 65 हजारांवर नेलं, देशभरातून संताप https://tinyurl.com/yftp8ubv


5) पहलगाम दहशतवादी हल्ला! महिला म्हणाल्या, टिकल्या काढल्यामुळे आम्ही वाचलो; शरद पवारांना अजून काय पुरावा पाहिजे? मनसेचे नेते प्रकाश महाजनांचा सवाल https://tinyurl.com/48k8d43k नागपूरमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला मोठे खिंडार; माजी सभापतीसह 16 सरपंच, 6 नगरसेवकांसह अनेकांचा भाजपमध्ये प्रवेश https://tinyurl.com/bdzjyk8b


6) वेळ आली आहे एकत्र येण्याची, मुंबई आणि महाराष्ट्रासाठी तयार, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची पोस्ट चर्चेत, मनसेसोबत युती होणार का? https://tinyurl.com/urtu4xyn मनसेकडून ठाकरे गटाला निमंत्रण दिल्यानं भाजप नाराज; प्रतिसभागृहात सहभागी होण्यास नकार https://tinyurl.com/283tx6wc


7)  मला राजकीय जीवनातून बाद करण्यासाठी माझ्या हितशत्रुंनी खोट्या बातम्या पेरण्याचा डाव केला, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अन्  मंत्री उदय सामंतांच्या भेटीनंतर ठाकरे गटाचे नेते चंद्रहार पाटील यांचं स्पष्टीकरण https://tinyurl.com/25erk48d सर्वधर्मसमभाव ही हिंदूंना दिलेली अफूची गोळी; मुघलांच्या खुणा असलेल्या गावांची नावे बदलण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार : गोपीचंद पडळकर https://tinyurl.com/4f9nkef4


8) बीडमध्ये 14 वर्षीय मुलीवर अत्याचार; पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल, पोलिसांसोबत आरोपीचे रिल्स समाज माध्यमावर व्हायरल, पीडित कुटुंबियांचा गंभीर आरोप https://tinyurl.com/32ww6ev6 परळीत चोरांचा उच्छाद, गुंगीचे औषध खाऊ घालून गाई पळवण्याचा प्रयत्न फसला, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद https://tinyurl.com/mueddxv2 


9) लोकप्रिय गायक एआर रेहमान आणि मद्रास टॉकीज यांना 2 कोटींचा दंड,  दिल्ली हायकोर्टाचा मोठा निर्णय, नेमकं प्रकरण काय? https://tinyurl.com/4z5utwan विक्की कौशलने कधीच म्हणू नये लोक मला बघायला आले, छावा चित्रपटाबाबत दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचं वक्तव्य https://tinyurl.com/544newns पाकिस्तानी अभिनेता फवाद खानच्या सिनेमाला फटका, युट्यूबवरुन गाणीही गायब; पहलगाम हल्ल्यानंतर भारतात चित्रपटावर बंदी https://tinyurl.com/yc7txdfy


10)  हैदराबादचा चेन्नईला दणका, 5 विकेट्सने केला पराभव, पराभव जिव्हारी लागल्यानं अभिनेत्री श्रुती हसनच्या डोळ्यात अश्रू https://tinyurl.com/ttf9kkfb भारताने पाकिस्तानवर लावलेल्या आरोपांचे पुरावे द्यावेत, पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीचं वक्तव्य, म्हणाला, केवळ संवादाद्वारेच पाकिस्तान आणि भारत यांच्यातील तणाव कमी होऊ शकतो https://tinyurl.com/3tvzs84e भारताच्या जीवावर पाकिस्तान क्रिकेट चालतं, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ठरवलं तर पीसीबी चक्काचूर होईल; पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधा रमीझ राजाचं वक्तव्य चर्चेत https://tinyurl.com/3m94n68j


एबीपी माझा Whatsapp Channel- 
https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w