नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम मधल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) देशभरात संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान या हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान काश्मीर खोऱ्यात सुरक्षा दलाकडून अनेक कारवाई सुरू करण्यात आली असून दहशतवाद्यांच्या ठाव ठिकाण्यावर जोरदार घाला घालण्यात येत आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारतानं जोरदार तयारी देखील सुरु केली आहे.
अशातच, पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही (Narendra Modi) निष्पाप भारतीयांचे बळी घेणाऱ्या अतिरेक्यांना गाडण्याचा इशारा दिला असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी देखील देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना महत्वाचे निर्देश दिले आहेत. केंद्र सरकारने दिलेली मुदत संपुष्टात आल्यानंतर एकही पाकिस्तानी नागरिक देशात थांबू नये, याची खात्री करावी. सोबतच पाकिस्तानी नागरिकांना शोधून काढा आणि तात्काळ परत जातील याची खात्री करा, असे निर्देश दिले आहेत. अमित शाहांच्या या निर्णयानंतर राज्यातील पाकिस्तानी नागरिकांच्याबाबतची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. ती खालील प्रमाणे आहे.
महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात किती पाकिस्तानी?
1) अकोला (AKOLA) - 222 अहिल्यानगर (AHILYANAGAR) 143 अमरावती (AMRAVATI C)- 1174 अमरावती (AMRAVATI R)- 15 छत्रपती संभाजीनगर (AURANGABAD C)- 586 छत्रपती संभाजीनगर (AURANGABAD R) - 17 छत्रपती संभाजीनगर ( AUR. RLY) 08 भंडारा (BHANDARA 0)9 बीड (BEED)- 0 10 बुलढाणा (BULDHANA)- 711 चंद्रपूर ( CHANDRAPUR)- 06 धुळे (DHULE) 613 धारशिव (DHARASHIV)- 014 गडचिरोली (GADCHIROLI)- 015 गोंदिया (GONDIA)- 516 हिंगोली (HINGOLI)- 017 जळगाव (JALGAON)- 39318 जालना (JALNA)- 519 कोल्हापूर (KOLHAPUR) - 5820 लातूर (LATUR) - 821 मुंबई (MUMBAI RLY)- 222 मुंबई (MBVV)- 2623 नाशिक (NASHIK C)- 824 नाशिक (NASHIK R)- 225 नागपूर (NAGPUR C)- 245826 नागपूर (NAGPUR R)- 027 नागपूर (NAGPUR RL)Y 028 नांदेड (NANDED) 429 नंदुरबार (NANDURBAR)- 1030 नवी मुंबई (NAVI MUMBAI)- 23931 परभणी (PARBHANI) 332 पालघर (PALGHAR) - 133 पिंपरी चिंचवड (PIMPRICHINCHWAD) -29034 पुणे (PUNE) - 11435 पुणे (PUNE R) -036 पुणे (PUNE RLY)- 037 रायगड (RAIGAD)- 1738 रत्नागिरी (RATNAGIRI) 439 सातारा (SATARA)- 140 सांगली (SANGLI)- 641 कोल्हापूर (SOLAPUR C) - 1742 सोलापूर (SOLAPUR R) 043 सिंधुदुर्ग (SINDHUDURG) 044 ठाणे (THANE C) 110645 ठाणे (THANE R) 046 वर्धा (WARDHA) 047 वाशिम (WASHIM) 648 यवतमाळ (YAVATMAL) 14
एकूण -5023
दरम्यान, पुढे आलेल्या अकडेवाडीनुसार, एकट्या नागपूर शहरात सर्वाधिक 2 हजार 458 पाकिस्तानी आढळले असून ठाणे शहरात 1106 पाकिस्तानी नागरिक सापडले आहेत. तर मुंबईत 14 पाकिस्तानी नागरिक राहत असल्याची माहिती समोर आली आहे. यामधील फक्त 51 पाकिस्तान्यांकडं वैध कागदपत्रं मिळाली आहेत. धक्कादायक म्हणजे, महाराष्ट्रात आलेले 107 पाकिस्तानी नागरिक बेपत्ता झाल्याचे आढळून आले आहे. 107 पाकिस्तान्यांचा पोलीस वा अन्य संस्थांना पत्ताच लागत नाहीय. दरम्यान जे सध्या राज्यात आहे त्यांचावर केव्हा आणि कशी कारवाई केली जाते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या