एक्स्प्लोर
एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 मार्च 2020 | शुक्रवार
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 मार्च 2020 | शुक्रवार
- कोरोनाच्या संकटात कर्जदारांना रिझर्व्ह बँकेचा दिलासा देण्याचा प्रयत्न, मासिक हप्ते तीन महिने स्थगित करण्याचा सल्ला, गृह आणि वाहन कर्ज स्वस्त होणार; तर रेपो रेटमध्ये मोठी कपात, 15 टक्क्यांवरुन 4.4 टक्क्यांवर https://bit.ly/3bui66j
- महाराष्ट्रात 17 नव्या रूग्णांसह कोरोनाग्रस्तांचा आकडा 147वर, सांगली, नागपूर, गोंदियात नवे रूग्ण, देशात 753कोरोनाबाधित https://bit.ly/33MMrdS
- प्रिन्स चार्ल्सनंतर ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनाही कोरोनाची लागण; स्वतःचं ट्विटर अकाउंटवरुन दिली माहिती https://bit.ly/3dClQVw
- जनतेच्या सोयीसाठी हॉटेलमधील पदार्थ घरी पोहोचवण्यासाठी तर अंडी, कोंबडी, मटण, मासे विक्रीला परवानगी; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती https://bit.ly/2UJXHU2
- खासगी डॉक्टरांनी असंवेदनशीलता न दाखवता आपापले दवाखाने सुरु ठेवावेत, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं आवाहन; तर कोरोनाशी लढणाऱ्या आरोग्य यंत्रणा, पोलिसांना इन्सेटिव्ह देण्याचीही घोषणा https://bit.ly/2WOIZ0O
- कोरोनामुळे शेतकऱ्यांची स्थिती बिकट, संकटापासून शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी लक्ष द्या, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सरकारला सूचना; तर पोलिसांना सौजन्यानं वागण्याचाही सल्ला https://bit.ly/2Jjr0aS
- रक्तदान हेच श्रेष्ठदान! रक्तदानासाठी तरुणाईची सोशल मीडियावर मोहीम, तीन दिवसात 400 पेक्षा जास्त तरुणांचं रक्तदान https://bit.ly/39nyLHa
- कोरोना व्हायरस विरोधात लढण्यासाठी आत्मबळ वाढवण्याची आवश्यकता, आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री श्री रविशंकर यांचं मत https://bit.ly/2WYepSH
- कोरोना व्हायरससोबत लढण्यासाठी शिर्डी साई संस्थानाकडून 51 कोटी रुपयांची राज्य सरकारला मदत https://bit.ly/3bGtYm7; तर कलाकार, राजकीय नेते, कर्मचारीही सरसावले http s://bit.ly/3dxg3Ad
- अकोल्यातील 'प्रहार'च्या तुषार पुंडकर हत्याकांडाचा उलगडा, 35 दिवसानंतर हत्येतील तिघांना अकोला पोलिसांकडून अटक https://bit.ly/3aoWYye
आणखी वाचा























