ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 मार्च 2025 | रविवार
1. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये न्यूझीलंडचे भारतासमोर 252 धावांचं लक्ष्य, ब्रेसवेल आणि मिचेलच्या खेळीने भारताचे आक्रमण रोखले, 9 षटकात 74 धावा देणार शमी ठरला महागडा गोलंदाज https://tinyurl.com/4yfrpwsn
2. माफीच्या लायकीचा नाही... हरिण, काळवीट मारणाऱ्या बीडच्या खोक्या उर्फ सतीश भोसलेला लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने अज्ञात व्यक्तीकडून धमकी https://tinyurl.com/3e5ufpm2
3. कुंभमेळ्यातील स्नानाची राज ठाकरेंकडून खिल्ली, श्रद्धा-अंधश्रद्धेतला फरक समजून घेण्याचं मनसेप्रमुखांचं आवाहन https://tinyurl.com/y7kn96at घरात बसून कुंभमेळ्याचं पाणी अस्वच्छ म्हणणं चुकीचं, राज ठाकरेंवर भाजपचा पलटवार https://tinyurl.com/2vfn95j9
4. जिजाऊंचा जन्मदिन हा महिला दिन म्हणून साजरा व्हायला हवा, पिंपरी-चिंचवडमधल्या मेळाव्यात राज ठाकरेंचं मत, महिला दिनाच्या पोकळ शुभेच्छांवर मनसेप्रमुखांचा सवाल https://tinyurl.com/5m5v339t पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या कामाचा दर 15 दिवसांनी आढावा घेणार, कामचुकार दिसला तर थेट हकालपट्टी करणार, राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना दम https://tinyurl.com/2t3vbjp9
5 माझ्या वडिलांचा गुन्हा काय? खंडणीखोरांनी वसूल केलेले पैसे कुणाला पोहोचत होते? संतोष देशमुखांची कन्या वैभवीचा बारामतीतल्या आक्रोश मोर्चात सवाल, तुमच्या आमदारामुळे राज्य नासत चाललंय, त्याला पाठीशी घालू नका, धनंजय मुंडेंचे नाव न घेता वैभवीचे अजित पवारांना आवाहन https://tinyurl.com/mhxy99j8 आरोपींना फाशीच झाली पाहिजे, टोळ्या सांभाळणाऱ्यांना थांबवलं पाहिजे, धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया https://tinyurl.com/232vac5x
6. तपास यंत्रणेकडे बक्कळ पुरावे, देवेंद्र फडणवीसांनी फक्त होय म्हणावं, एका तासात धनंजय मुंडे सहआरोपी होतील, मनोज जरांगेंचे वक्तव्य https://tinyurl.com/3rvnhtrz धनंजय मुंडेंची कीव येते, ते देशमुख प्रकरणात सापडले तर तुरुंगात वाल्मिक कराडच्या शेजारच्या खोलीत जातील, सुरेश धसांचे 'माझा कट्टा'वर वक्तव्य https://tinyurl.com/y9d7xd8w गोळीबाराच्या एका घटनेने वाल्मिक घरगड्याचा मालक झाला, सुरेश धसांची टीका https://tinyurl.com/24thk2rz
7. पुण्यात रस्त्यात गाडी थांबवून रस्त्यावर लघुशंका करणारा गौरव आहुजा आणि त्याच्या मित्राला एक दिवसाची पोलिस कोठडी, गौरवला येरवड्यात मिळालेली व्हीआयपी ट्रीटमेंट चर्चेत, पोलिसांचा मात्र इन्कार https://tinyurl.com/n9ysskd6
8. पुण्यात मेट्रोच्या ट्रॅकवर उतरून शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन, मेट्रोमध्ये तरुणांना रोजगार देण्याची मागणी, तर प्रशासनाला वेठीस धरल्यामुळे पक्षातून हकालपट्टी https://tinyurl.com/2vc3t4rc
9. मुंबईच्या नागपाड्यात चार कामगारांचा मृत्यू तर एक जण जखमी, निर्माणाधीन इमारतीतील पाण्याची टाकी स्वच्छ करताना गुदमरून मृत्यू झाल्याची माहिती https://tinyurl.com/2dddj84d
10. बीड जिल्ह्यातल्या पाटोद्यात रक्षकच झाला भक्षक, महिलादिनीच पोलिस ठाण्याच्या बीट अंमलदाराचा एका महिलेवर बलात्कार, बीड पोलिस अधीक्षकांना अहवाल देण्याचे राज्य महिला आयोगाचे आदेश https://tinyurl.com/4wwwjkhp
एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w